बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा राजा हिंदुस्तानी हा चित्रपट सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटातली तगडी स्टार कास्ट, गाणी आजही २५ वर्षे उलटून गेली तरी प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली आहेत. लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानेही त्याच्या काही आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. एवढंच काय तर करिश्मा देखील चित्रीकरणाच्या दिवसांना विसरू शकली नाही.

चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश यांनी १९९६ मध्ये आलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी आधी ऐश्वर्या रायला ऑफर दिली होती. त्यानंतर जूही चावलाला ऑफर दिली पण तिने काही कारणांमुळे नकार दिला. त्यानंतर त्यांनी पूजा भट्टला चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची ऑफर दिली होती. मात्र, काही कारणांमुळे तिने देखील नकार दिला. त्यानंतर आमिरने धर्मेश यांना सल्ला देत म्हणाला, तुम्ही अशा अभिनेत्रीला घ्या जिच्यासोबत मी आधी चित्रपट केला नाही. त्यानंतर करिश्माला या चित्रपटात घेण्यात आलं.

आणखी वाचा : KBC 13 : उंच आहात तर घरातील पंखे तुम्ही साफ करता का? एका लहान मुलाने विचारलेल्या प्रश्नाचे बिग बींनी दिले भन्नाट उत्तर

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातली गाणी तर गाजलीच. पण त्यासोबत चर्चा होती ती आमिर आणि करिश्माच्या किसिंग सीनची. या किंसिंग सीन विषयी बोलताना एका मुलाखतीत करिश्माने सांगितलं की, “राजा हिंदुस्तानी चित्रपटाबद्दल अनेक आठवणी आहेत. पण जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा लोकांमध्ये किसिंग सीनसंबंधी चांगलीच चर्चा होती. पण त्यांना माहिती नाही की, हा सीन शूट करण्यासाठी आम्हाला तीन दिवस लागले होते. फेब्रुवारी महिन्यात उटीमध्ये खूप थंडी होती आणि हा सीन संध्याकाळी सहा वाजता शूट केला जात होता. त्यामुळे मी अक्षरश: थरथरत होते. हा सीन कधी संपणार असा विचार करत होते”. यामुळे या किसिंग सीनला बॉलिवूडमधील सगळ्यात मोठा किसिंग सीन असल्याचं म्हटलं जातं.

आणखी वाचा : आई बंगाली आणि वडील जर्मन मग मुस्लीम आडनाव का लावते दिया मिर्झा?

‘राजा हिंदुस्तानी’ हा बॉलिवूडमधील एक सुपरहिट चित्रपट आहे. या चित्रपटात आमिर खान, करिश्मा कपूर, सुरेश ओबेरॉय, अर्चना पुरन सिंह, जॉनी लिव्हर यांसारखे अनेक कलाकार झळकले होते. धर्मेश दर्शन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. २४ वर्षांपूर्वी या चित्रपटाने तब्बल ३०० कोटी रुपयांची कमाई केली होती.

Story img Loader