बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकारांना मिसळ पाव असो वा महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेणं नेहमीच आवडतं. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे अक्षय कुमार मध्यंतरी पुण्यामध्ये गेला होता. यावेळी त्याने मिसळ पाववर ताव मारला. यादरम्यानचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता करिश्मा कपूर व करीना कपूर खानला महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्याचा मोह आवरला नाही. या दोन्ही बहिणींनी झुणका-भाकरीवर ताव मारला.
आणखी वाचा – आमिर खानचा होणारा मराठमोळा जावई आहे तरी कोण? न्यूड फोटोशूटमुळे होता चर्चेत
करिश्मा व करीना ही सेलिब्रिटी बहिणींची जोडी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. या दोघीही सोशल मीडिया अकाऊंटद्वारे आपल्या दिनक्रमाबाबत माहिती देताना दिसतात. करिश्माची अशीच एक पोस्ट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरच्या घरी करिश्मा-करीना गेल्या होत्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला.
ऋजुताने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसाठी काम केलं आहे. शिवाय करीनाचीही ती आहारतज्ज्ञ होती. ऋजुताने या दोघींसाठी मराठमोळ्या पद्धतीचं जेवणं बनवलं होतं. करिश्माने व्हिडीओ तसेच फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
आणखी वाचा – Video : ऐश्वर्या राय बच्चन दुसऱ्यांदा गरोदर? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
झुणका, भाकरी, अंबाडी भाजी, कोथिंबीर वडी, सोलकढी, भोपळ्याचे भरीत खाल्लं असल्याचं करिश्माने सांगितलं. कौतुकास्पद म्हणजे करिश्माने मराठीमध्ये पोस्ट शेअर केली आहे. “महाराष्ट्रीयन मील डे” असं करिश्माने फोटो पोस्ट करत म्हटलं आहे.