दिग्दर्शक अभिनेता अशा दोन्ही महत्त्वाच्या जबाबदऱ्या स्वतःच्या खांद्यावर पेलत रिषभ शेट्टीने ‘कांतारा’ सुपरहीट करून दाखवला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट इतिहास रचतो आहे. कन्नड भाषेत या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद बघूनच हा चित्रपट हिंदी आणि तेलुगूमध्ये डब करून प्रदर्शित करायचा निर्णय घेतला. या चित्रपटाने १७० कोटीचा आकडा पार केला आहे. सगळ्याच स्तरातून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनीही या चित्रपटाची दखल घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटातून प्रेरणा घेत कर्नाटक सरकारने एका मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील वयाची ६० वर्षं ओलांडलेल्या सर्व ज्येष्ठ दैव नर्तकांना कर्नाटक सरकार एक विशेष भत्ता देणार असल्याचं जाहीर केलं आहे. ‘कांतारा’ची कथा याच दैव नर्तकांच्याभोवती फिरते. या चित्रपटाचा सांस्कृतिक परिणाम म्हणून कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. कोस्टल कर्नाटकातील बऱ्याच गावात हे नर्तक राहतात त्यांच्यासाठी हा खास भत्ता दिला जाणार आहे.

आणखी वाचा : “भारतीय प्रेक्षक खूप…” अभिनेता, दिग्दर्शक रिषभ शेट्टीने उलगडलं ‘कांतारा’च्या यशामागील रहस्य

बेंगलोरचे खासदार पीसी मोहन यांनी ट्वीट करत हा निर्णय जाहीर केला आहे. ते म्हणतात, “ही एक पवित्र कला आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार आता ६० वर्षावरील दैव नर्तकांना २००० रुपये मासिक भत्ता देणार असल्याचं जाहीर करत आहे. चित्रपटात दाखवलेली ‘भूत-कोला’ ही प्रथा ही हिंदू धर्माचा एक पवित्र भाग आहे.” हे ट्वीट करत त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टीलाही टॅग केलं आहे.

ही बातमी ऐकून सोशल मीडियावर चाहत्यांनी या निर्णयाचं मनापासून स्वागत केलं आहे. ‘चित्रपटाचं समाजातलं योगदान काय असतं ही कांताराने दाखवून दिलं’ असं म्हणत नेटकऱ्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. कर्नाटक सरकारने उचललेलं हे पाऊल स्तुत्य आहे असंही कित्येकांनी म्हंटलं आहे. ३० सप्टेंबरला ‘कांतारा’ कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. आज हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर इतिहास रचतोय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka government biggest decision for daiv narthakas after huge success of kantara avn
Show comments