कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून वाद अद्याप सुरूच आहे. कर्नाटकात सुरू असलेला हिजाब वादाचा मुद्दा आता देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानंतर सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारही यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

स्वरा भास्करने कर्नाकटमधील घटनेचा व्हिडीओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. तिने हा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर करत ‘भेड़िये’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर कर्नाकटमधील या घटनेनंतर कमल हसन, रिचा चड्ढा यांनी आंदोलकांवर मुलींची छेडछाड केल्याबद्दल टीका केली होती. त्यापाठोपाठ जावेद अख्तर, स्वरा भास्कर यांनी ट्वीट करून या घटनेचा निषेध केला आहे.

News About Ranvir allahbadia
Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादिया, समय रैनासह पाच जणांविरोधात ‘या’ राज्यात अश्लीलता पसरवल्याचा गुन्हा, आक्षेपार्ह वक्तव्याचं प्रकरण भोवलं
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
MLA Sangram Jagtap complains about increase in Bangladeshi infiltrators in Ahilyanagar
अहिल्यानगरमध्ये बांगलादेशी घुसखोर वाढल्याची आमदार संग्राम जगताप यांची तक्रार
ranveer allahbadia on indias got latent video
स्पर्धकाच्या आई-वडिलांच्या प्रायव्हसीवर अश्लील वक्तव्य; रणवीर अलाहाबादियावर लोकांचा संताप, म्हणाले, “विकृत…”
Rohit Sharma furiously tells DJ to shut off music during IND Vs ENG 2ND ODI video goes viral
IND vs ENG: “बंद कर ए…”, रोहित शर्मा शतकी खेळीदरम्यान अचानक कोणावर संतापला? घातली शिवी; VIDEO व्हायरल
khushi kapoor junaid khan
“अनेक विचित्र गोष्टी…”, खुशी कपूर आणि जुनैद खान एआयच्या गैरवापरावर झाले व्यक्त; म्हणाले, “लोकांनी स्वत:ला…”
Young man beaten up for watching news against Valmik Karad and Dhananjay Munde
“वाल्मीक कराड, मुंडेंविरोधातील बातम्या का पाहतो” म्हणत तरुणाला मारहाण, बीडच्या धारूरमधील घटना
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?

काय आहे नेमके प्रकरण?

कर्नाटकातील उडुपी येथील एका महाविद्यालयात सहा मुलींना महाविद्यालयीन गणवेश परिधान न करता हिजाब परिधान केल्यामुळे त्यांना वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. यानंतर या मुलींनी आंदोलन केले होते. कॉलेजला न जुमानता त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर हा वाद कर्नाटकातील अनेक कॉलेजांमध्ये सुरु झाला.

दरम्यान कर्नाटकातील उडुपी कॉलेजमध्ये हिजाब परिधान केल्याच्या घटनेने सुरू झालेल्या वादाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. अनेक विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावरून आंदोलनं करताना दिसत आहे. हिजाबच्या विरोधात काही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली होती. आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदी प्रकरण बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या व्यापक खंडपीठाकडे प्रविष्ट करण्यात आल़े आहे. त्यावर आज, गुरुवारी सुनावणी होणार आहे.

Story img Loader