आपल्याकडे आजही मूळ प्रवाहातील चित्रपट आणि प्रादेशिक चित्रपट यात फरक केला जातो. आता कुठे ही परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे, तरी कमर्शियल चित्रपटांसमोर प्रादेशिक चित्रपट दबले जातात हे सत्य नाकारून चालणार नाही. पण तरी काही चित्रपटांनी व्यावसायिक चित्रपटांना चांगलंच मागे टाकल्याचं आपण पाहिलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’च्या घवघवीत यशानंतर ‘कार्तिकेय २’ या चित्रपटाला अभूतपूर्व असं यश मिळालं. आमीरचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर येऊन या चित्रपटाने आमीरच्या चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आणि बॉक्स ऑफिसवर एक वेगळा इतिहास रचला.

याच चित्रपटातील अभिनेता निखिल सिद्धार्थ यांच्याशी ‘टाइम्स नाऊ डिजिटल’ने संवाद साधला. यादरम्यान निखिल यांनी बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं. चित्रपटाच्या यशाबद्दल निखिल म्हणतात, “हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही आमची इच्छा होती. शिवाय श्रीकृष्णाचे भक्तदेखील बरेच आहेत, पण प्रेक्षक आमच्या चित्रपटाला एवढं डोक्यावर घेतील याचा मी कधीच विचार केला नव्हता.”

ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
suraj chavan shares reel video on riteish deshmukh ved song
रितेश देशमुखच्या सुपरहिट मराठी गाण्यावर सूरजचा जबरदस्त अंदाज! Video पाहून नेटकरी म्हणाले, “लय भारी…”
Kishkindha Kaandam OTT Release
फक्त सात कोटींचे बजेट, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; OTT वर रिलीज होतोय ‘हा’ सुपरहिट चित्रपट
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”

आणखी वाचा : Kantara Movie Review : आपल्या परंपरेला आणि लोककलेला अभिमानाने जगासमोर सादर करणारा ‘कांतारा’

याच मुलाखतीमध्ये निखिल यांना नॉर्थ आणि साऊथ या वादाविषयी विचारलं गेलं तेव्हा निखिल यांनी त्यांचं मत अगदी स्पष्टपणे मांडलं. निखिल म्हणाले, “मला सगळ्या प्रकारचे चित्रपट पाहायला आवडतात. ‘अंदाज अपना अपना’, ‘कुछ कुछ होता है’ किंवा रजनीकांत यांचे चित्रपट मी आजही आवडीने बघतो आणि मला ते खूप आवडतात. प्रेक्षकसुद्धा चित्रपटप्रेमीच आहेत, त्यामुळे हा नॉर्थ-साऊथ वादाचा मुद्दा काही मोजक्या लोकांपुरता मर्यादित आहे. या वादात न पडता एक उत्तम चित्रपट कसा तयार करता येईल याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आजच्या काळात सगळ्याच भाषेतील कलाकारांना प्रेक्षक भरपूर प्रेम देत आहेत आणि मी त्यापैकी एक आहे याचा मला प्रचंड आनंद आहे.’ब्रह्मास्त्र’ने तेलुगू भाषेत चांगला व्यवसाय केला, चित्रपट चांगला असेल तर प्रेक्षक तो पाहायला येतात, आणि जे वाद घालतात ते कधीच चित्रपटगृहाकडे फिरकत नाहीत.”

निखिल यांनी मुलाखतीमध्ये यावर मत देऊन या वादालाच एक पूर्णविराम दिला आहे. प्रादेशिक भाषेतील चित्रपटाला मिळणारी लोकप्रियता वाढत आहे. नुकताच आलेला ‘कांतारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करायला सुरुवात केली आहे. याप्रमाणेच निखिल यांच्या पुढच्या चित्रपटालाही प्रेक्षक असाच उदंड प्रतिसाद देतील अशी आशादेखील त्यांनी यात व्यक्त केली आहे.