अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या हिट चित्रपटांमुळे सतत चर्चेत आहे. कार्तिक आर्यन नुकत्याच मुंबईत आयोजित केलेल्या ओटीटी प्ले अवॉर्ड्स सोहळ्यात सहभागी झाला होता. यावेळी सारा अली खान आणि इतर अनेक कलाकारांनीही या ठिकाणी हजेरी लावली होती. या अवॉर्ड सोहळ्यात सारा आणि कार्तिक पुन्हा एकदा एकत्र दिसले. या इव्हेंटमधील सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघे एकत्र बसून बोलताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सारा आणि कार्तिकच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन ब्लॅक ब्लेझर, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक टायमध्ये दिसत आहे, तर सारा पिवळ्या रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये दिसत आहे. दोघे एकत्र बसून हसत आहेत. एकेकाळी एकमेकांना डेट करणारे कार्तिक आणि सारा यांच्यात ब्रेकअपनंतरही दिसणारे बॉन्डिंग पाहून त्यांचे चाहते खूप खूश आहेत. सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या केमिस्ट्रीचीच चर्चा आहे.
आणखी वाचा- कार्तिक आर्यनने केला लव्ह लाइफबाबत खुलासा, म्हणाला “खरं प्रेम मिळण्यासाठी…”

सारा आणि कार्तिकची हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यनच्या हातात ट्रॉफीही दिसत आहे आणि तो साराशी काही विषयावर बोलताना दिसत आहे. दुसरीकडे, सारादेखील कार्तिकशी हसून बोलताना दिसतेय. दोघांच्या चाहत्यांसाठी हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण एकेकाळी दोघेही एकमेकांना डेट करत होते.

आणखी वाचा- “अनेकांना वाटतं मी त्यांच्या संधी हिसकावते…” भारती सिंगचं विधान चर्चेत

दरम्यान हा पहिला ओटटी प्ले अवॉर्ड होता, जो मुंबईत आयोजित करण्यात आला होता. शनिवारी संध्याकाळी झालेल्या या अवॉर्ड फंक्शनमध्ये रेड कार्पेटवर अनेक स्टार्स दिसले. सारा अली खानने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या सेलिब्रिटी चॅट शोमध्ये सांगितले होते की, तिला कार्तिक आर्यनला डेट करायचे आहे. त्यानंतर दोघेही एका चित्रपटात एकत्र दिसले होते आणि यादरम्यान दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aaryan and sara ali khan spotted together at ott play award mrj