अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या बहुचर्चित ‘भूल भुलैय्या २’ (Bhool Bhulaiyaa 2) चित्रपटाला मिळत असलेलं यश एण्जॉय करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो देशभर फिरत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचे त्याचे बरेच फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. लवकरच कार्तिकचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिरत असेलल्या कार्तिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

कार्तिक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्याला गेला होता. तिथून परतीचा प्रवास करत असताना कार्तिकला भूक अनावर झाली. मध्यरात्रीच हायवे लगतच्या एका ढाब्यावर त्याने गाडी थांबवली आणि रस्त्यावरच उभं राहून तो भात-पापड खाऊ लागला. याचदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांना कार्तिकचं आश्चर्य वाटलं.

आणखी वाचा – VIDEO : …अन् पार्टीमध्ये बेधूंद होऊन नाचत राहिला शाहरुख खान, अभिनेत्याचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ चर्चेत

कोटी रुपयांचं मानधन घेणारा अभिनेता तसेच कोटी रुपयांच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या कार्तिकला रस्त्यावर उभं राहून जेवताना पाहिल्यावर नेटकरीही खूश झाले. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी चांगल्या कमेंट्स करत त्याचं कौतुक केलं. खरं तर कार्तिकचा साधेपणा यामधून स्पष्टपणे दिसून येत आहे. भूक अनावर झाली म्हणून कोणत्याही महागड्या हॉटेलमध्ये न थांबता तो चक्क रस्त्यावर उभा राहून जेवत होता. याचं सगळ्यांना नवल वाटलं.

आणखी वाचा – “बॉलिवूड संपणार हे शब्दच ऐकून…” साऊथ-बॉलिवूड वादाबाबत असं का बोलला दिग्दर्शक रोहित शेट्टी?

आणखी वाचा – Photos : मराठमोळा साज! नाकात नथ, केसात गजरा अन् भरजरी शालूमध्ये खुललं पाठकबाईंचं सौंदर्य

कार्तिकने बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं असलं तरी त्याच्यामधील साधेपणा हा कायम टिकून आहे. इतकंच नव्हे तर याआधीही कार्तिक आर्यनचा रस्त्यालगतच्या स्टॉलवर खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कार्तिकने करोडो रुपयांच्या गाडीमधून प्रवास न करता रिक्षामधून प्रवास करत असल्याचंही मध्यंतरी समोर आलं होतं. कार्तिकचा हा साधेपणा त्याच्या चाहत्यांना अधिक आवडतो.

Story img Loader