बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांशी तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची अपडेट देत असतो. त्याने नुकत्याच केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कार्तिकने ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलातील अधिकाऱ्यांसोबत एक दिवस घालवला. याचे फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कार्तिकची प्रशंसा केली आहे.
भारतीय नौदल अधिकाऱ्यांसोबत कार्तिकने विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचे फोटो आणि व्हिडीओमधून दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये कार्तिक तेथील अधिकाऱ्यांसोबत ‘टग ऑफ वॉर’ खेळताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये काही जवानांसोबत तो व्हिडीओ गेम खेळताना दिसत आहे. यावेळी तेथील जवानांना ‘भूल भुलय्या २’ मधील हुक स्टेप शिकवत कार्तिकने त्यांच्या सोबत डान्स देखील केला. या पोस्टला त्याने ‘जय जवान! एक दिवस नौदलाच्या शूर सैनिकांसोबत’ असे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा – धर्मिक भावना दुखावल्याचा आरोप, कार्तिक-कियाराच्या आगामी चित्रपटाचे नाव बदललं
आणखी वाचा – “मी खूप लोकप्रिय…” नाव न घेताच कार्तिक आर्यननं मारला करण जोहरला टोमणा
आर्यनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, तो सध्या ‘शेहजादा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनॉन झळकणार आहे. हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलू’ या तेलुगू चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. याआधी कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलय्या २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे कार्तिक आर्यनचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांसाठी उत्सुक आहेत.