बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा लोकप्रिय अभिनेता आहे. कार्तिकचे लाखो चाहते आहेत. आर्यन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच त्याने त्याच्या चाहत्यांशी ‘Ask me anything’द्वारे संपर्क साधला होता. यावेळी एका नेटकऱ्याने कार्तिकला धमकी दिली आहे.
कार्तिकने ट्विटरवर चाहत्यांशी ‘Ask me anything’द्वारे संपर्क साधला. कार्तिकच्या चाहत्यांमध्ये मुलींची संख्या ही जास्त आहे. त्यात जेव्हा आपल्या आवडत्या कलाकाराशी बोलण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना आनंद होतो. तसाच आनंद एका चाहतीला झाला. मात्र, सेलिब्रिटी हे त्यांच्या प्रत्येक चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देऊ शकत नाही. हे पाहता एक चाहती कमेंट करत म्हणाली, ‘जेव्हा तुम्हाला इतरांशी बोलून वेळ मिळेल, तेव्हा मेसेज करा, नाहीतर मी माझी नस कापून टाकेन.’
आणखी वाचा : आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या क्रूझवरील पार्टीचा व्हिडीओ आला समोर
यावर कार्तिकने शांतित उत्तर दिले आणि म्हणाला, कधीच असा विचार करू नकोस. यासोबत कार्तिकने लाल रंगाचे हार्ट इमोजी वापरले. कार्तिक लवकरच ‘भूल भुलैया २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसेल. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असणार आहे.