बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने ‘प्यार का पंचनामा’, ‘लुकाछुपी’, ‘पती पत्नी और वो’, ‘भूल भुलैय्या 2’ अशा चित्रपटांमधून स्वतःला सिद्ध केल आहे. त्याचप्रमाणे तो अनेक मोठाल्या ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींमध्येही आपल्याला दिसतो. तो बॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यामुळे चित्रपट आणि जाहिरातींमध्ये त्याला घेण्यासाठी अनेक निर्माते उत्सुक असतात. पण नुकतीच एक पान मसाल्याची जाहिरात नाकारली आहे.
आणखी वाचा : विजय सेतुपतीचा भाव वाढला, ‘जवान’ चित्रपटासाठी आकारले ‘इतके’ कोटी मानधन
या पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी त्याला कोट्यवधी रुपये ऑफर करण्यात आले होते. मात्र, तरीही त्याने या जाहिरातीला नाकार देत या मोठ्या ऑफरवर पाणी सोडलं आहे. काही दिवसांपूर्वीच पान मसाल्याची जाहिरात केल्यामुळे अक्षय कुमार ट्रोल झाला होता. तेव्हापासून अनेक कलाकारांनी पान मसाल्याची जाहिरात करण्यास नकार दिल्याचं समोर येत आहे.
काही महिन्यांपूर्वीच अक्षय कुमार पान मसाल्याची जाहिरात केल्यामुळे ट्रोल झाला होता. ते प्रकरण ताजे असतानाच केजीएफ फेम दक्षिणात्य सुपरस्टार यशलाही एक पान मसाल्याची जाहिरात ऑफर झाली होती आणि त्याने ती नाकारली. त्याच्यानंतर आता कार्तिक आर्यननेदेखील कोट्यावधींच्या ऑफरला नाकार दिला आहे. या जाहिरातीसाठी त्याला तब्बल ९ कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र, त्याने ही ऑफर नाकारली आहे. त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे सध्या नेटकऱ्यामध्ये त्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा : शूटिंग, शूटिंग आणि फक्त शूटिंग…कार्तिक आर्यनने शेअर केले ‘शेहजादा’ चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो
आतापर्यंत अजय देवगण, शाहरुख खान, अक्षय कुमार अशा अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्यांनी पान मसाल्याची जाहिरात केली. या सगळ्यांना नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. अलिकडेच अभिनेता अक्षय कुमारने पान मसाल्याची जाहिरात केल्याने त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. नेटकऱ्यांच्या या टीकेमुळे त्याने अखेर जाहीरपणे प्रेक्षकांची माफी मागितली होती. परंतु आता कार्तिक आर्यनने ही पान मसाल्याची जाहिरात नाकारल्याने त्याचे कौतुक होत आहे. तसेच त्याने तरुण पिढीला नवा आदर्श घालून दिला असल्याचेही नेटकरी म्हणत आहेत.