बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींशी त्याचं नावही जोडलं गेलं होतं. याशिवाय कार्तिक आर्यनला अनेक बॉलीवूड अभिनेत्रींसोबत हँग आउट करताना पाहिलं गेलं आहे. पण कार्तिक आर्यनने त्याच्या रिलेशनशिप किंवा लव्ह लाइफबद्दल फार क्वचितच भाष्य केलं आहे. सारा अली खानसह ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाचे शूटिंग करत असताना त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्तिक आर्यनने आता CNN-News18 ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या लव्ह लाइफबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. प्रेमाच्या बाबतीत तो स्वतःला भाग्यवान समजत नाहीत. जेव्हा कार्तिकला त्याच्या लव्ह लाइफबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “आयुष्यात खरे प्रेम मिळण्यासाठी तुम्ही खूप भाग्यवान असलं पाहिजे. कदाचित मी आतापर्यंत इतका भाग्यवान नव्हतो.”

कार्तिक आर्यनला ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बरीच प्रसिद्धी मिळाली होती. चित्रपटातील त्याचे डायलॉग प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाले होते. या चित्रपटाचा सीक्वल ‘सोनू के टीटू की स्वीटी’ २०१८ साली रिलीज झाला होता. कार्तिक आर्यन त्याच्या फिल्मी करिअरबद्दल म्हणाला, “माझी स्वप्नं होती, ज्यांच्यासह मी मुंबईत आलो. ती स्वप्नं आता पूर्ण होत आहेत.”

आणखी वाचा- “सुशांतचं ‘ब्रह्मास्त्र’ संपूर्ण इंडस्ट्रीला…” बहीण मीतू सिंहची बॉलिवूडकरांवर टीका

कार्तिक आर्यनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. तो शेवटचा ‘भूल भुलैया २’ मध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने रूह बाबाची भूमिका साकारली होती. बॉलीवूडचे बहुतेक चित्रपट फ्लॉप होत असताना हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आपल्या यशाबद्दल कार्तिक म्हणाला, “मला लोकांचे मनोरंजन करायला आवडते. माझ्या चित्रपटांना लोक ज्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत त्यामुळे मी खूप खूश आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aryan talk about his love life says lucky one got real love mrj