छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता साहिल गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. साहिल आनंद सोशल मीडियावर तसा चांगलाच सक्रिय आहे. मात्र काही वेळासाठी साहिलने सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. १९ जुलै रोजी साहिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मोठी पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये तो मानसिक आरोग्याबद्दल बोलत होता. याच कारणामुळे त्याने काही काळ सोशल मीडियापासून लांब राहणार असल्याचे पोस्टद्वारे सांगितले. या निर्णयामुळे त्याच्या बऱ्याच चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता जरी साहिल छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय अभिनेता असला तरी ही यशाची पायरी चढण्याआधी त्याच्याकडे दोनवेळच्या जेवणाची भ्रां होती. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने त्याच्या स्ट्रगलींग काळाबद्दल सांगताना खुलासा केला आहे.
साहिल आनंदने त्याच्या करिअरची सुरवात ‘एम टीव्ही’च्या एका शोमधून केली. नंतर त्याच्या स्ट्रगलींग काळाबद्दल बोलताना त्याने ‘टाइम्स नाऊ’ ला सांगितले की, ” मी कोणत्या शाळेतून अभिनय शिकलो नाही, सुरवातीच्या काळात माझ्या दोनवेळच्या जेवणाची भ्रांत होती. मला विचार करायला लागायचा की मी सकाळी जेवण का संध्याकाळचे? आम्ही एका खोलीत ६-७ लोकांसोबत राहायचो आणि जमिनीवर झोपायला लागायचे.”
View this post on Instagram
यापुढे त्याने सांगितले की, “मी एका सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे, माझ्या आई-वडिलांच्या मर्जी विरुद्ध मी मुंबईत आलो. तसंच मी त्यांच्याकडून एकही पैसा घेणार नाही असे ठरवले होते, त्यामुळे या शहरात माझे मला बघावे लागत होते.” दरम्यान साहिल आनंदने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात काम केले. ‘है अपना दिल तो आवारा’, ‘बिग बॉस’ आणि ‘कसोटी जिंदगी की’ सारख्या अनेक मालिकांमध्ये देखील तो झळकला होता.