बॉलिवूड अभिनेत्री कश्मिरा शाह सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते. यावेळी ती अभिनेता सलमान खानमुळे चर्चेत आहे. नुकतेच सलमानने मृत्यूशी झुंज देणाऱ्या फराज खानला आर्थिक मदत केली. या मदतीसाठी कश्मिराने सलमानचे आभार मानले. शिवाय “मला अनफॉलो करा पण सलमानवर मात्र टीका करु नका” अशी विनंती तिने आपल्या चाहत्यांना केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य पाहा – ‘रामायणात १४ वर्षांचा वनवास होतो अन् करोनात…’; अभिनेत्रीने मानले BMC चे आभार

“सलमान तू खरंच एक चांगला माणूस आहेस. फराजला आर्थिक मदत करण्यासाठी तू स्वत:हून पुढे आलास. या मदतीसाठी तुझे मनापासून आभार. मी तुझी खरी चाहती आहे. अनेक लोक तुझ्यावर टीका करतात पण मला फरक पडत नाही. टीकाकारांना माझी विनंती आहे की गरज पडल्यास तुम्ही मला अनफॉलो करा पण कृपया सलमानवर मात्र खोटे आरोप करु नका.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून कश्मिराने सलमानचे आभार मानले आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; पूजा भट्टने देशवासीयांना केली मदतीची विनंती

फराज सध्या बंगळुरुमधील एक खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला तीसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. फराज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. १९९६ साली ‘फरेब’ या चित्रपटातून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यांनंतर ‘पृथ्वी’, ‘मेहंदी’, ‘दुल्हन बनू में तेरी’, ‘चाँद बुझ गया’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. शिवाय ‘वन प्लस वन’, ‘शूsssss कोई है’, ‘रात होने को है’, ‘करिना करिना’ यांसारख्या काही मालिकांमध्ये देखील त्याने काम केलं होतं. परंतु २००८ नंतर त्याला फारसं काम मिळलं नाही. त्याच दरम्यान त्याला कर्करोग देखील झाला. परिणामी अभिनयापासून हळूहळू तो दूर होत गेला. सध्या बंगळुरुमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashmira shah salman khan faraaz khan mppg