बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा शाही विवाह सोहळा अवघ्या काही दिवसांपूर्वीच पार पडला. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट या ठिकाणी ते विवाहबंधनात अडकले. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. नुकतंच विकी-कतरिना हे नवविवाहित जोडपं मुंबईत परतले आहेत. मुंबई विमानतळावर त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनेक पापाराझींनी विकी-कतरिनाचे हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ते दोघेही फार सुंदर दिसत आहे. यावेळी विकीने क्रीम रंगाचे शर्ट आणि पँट परिधान केली होती. त्यासोबत त्याने छान राजस्थानी बूट घातले होते. तर नववधू कतरिनाने छान सलवार ड्रेस घातला होता. विशेष म्हणजे यावेळी तिच्या भांगेत कुंकू भरलेले पाहायला मिळाले. तसेच तिच्या हातावर असलेली मेहंदी आणि छान लाल रंगाचा चुड्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
यावेळी पहिल्यांदाच विकी-कतरिनाने हातात हात घालून फोटोंसाठी पोज दिली. यावेळी त्या दोघांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद पाहायला मिळत होता. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दरम्यान या दोघांच्या लग्नाचे सर्व विधी अत्यंत गुप्तता पाळून केले. विशेष म्हणजे लग्नाला राजस्थानला रवाना होण्यासाठीही हे दोघे वेगवेगळे रवाना झाले होते. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. त्या दोघांनीही लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.