गेल्या वर्षी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी राजस्थानमधल्या ‘सिक्स सेन्स फोर्ट’ या ठिकाणी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाबाबत खूप गोपनीयता राखण्यात आली होती. दोघे ९ डिसेंबरला कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रमंडळीच्या उपस्थितीमध्ये विवाह बंधनात अडकले. लग्नाआधी कतरिना-विकीने त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. ते एकमेकांना डेट करत आहेत याची कबुलीही त्यांनी दिली नव्हती. कोणताही गाजावाजा न करता प्रत्यक्ष लग्नातले फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या लग्नातील फोटो खूप जास्त व्हायरल झाले होते.

बॉलिवूड क्यूट कपल्सच्या यादीमध्ये कतरिना आणि विकीच्या जोडीचा समावेश झाला आहे. दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार कलाकार आहेत. पण अभिनय क्षेत्रात असूनही त्यांनी कधीही एकत्र काम केले नाही. या जोडीला ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. ‘इंडिया टूडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, कतरिना-विकी हे एकत्रितपणे एका जाहिरातीमध्ये झळकणार आहेत. २९ ऑगस्टला ते दोघे या जाहिरातीच्या चित्रीकरणांसाठी मेहबूब स्टुडिओला पोहोचले. ही जाहिरात लवकरच प्रदर्शित होणार आहे. या जाहिरातीच्या निमित्ताने ही नवविवाहीत जोडी पहिल्यांदा ऑनस्क्रीन दिसणार आहे. काही दिवसांमध्ये ते दोघे एकत्र सिनेमा करणार आहे असे म्हटले जात आहे.
आणखी वाचा- कतरीना आणि विकीच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन ? क्लिनिकबाहेरचे फोटो व्हायरल

कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. ‘सूर्यवंशी’, ‘टायगर जिंदा है’, ‘धूम ३’, ‘भारत’, ‘बँग बँग’ अशा बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. तिचा ‘टायगर ३’ हा बिगबजेट चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. विकी कौशलने ‘लव शव दे चिकन खुराना’ या चित्रपटामध्ये एक छोटी व्यक्तिरेखा साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘मसान’ या २०१५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये विकी प्रमुख भूमिकेत होता. त्याने ‘रमण राघव’, ‘राझी’, ‘संजु’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ आणि ‘सरदार उधम’ अशा दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट काही महिन्यानंतर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader