बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्या हळदीचे आणि संगीत कार्यक्रमातील काही फोटो कतरिना आणि विकीने शेअर केले होते. त्यानंतर आता कतरिनाच्या बहीण आणि भावाने मेहंदीचे काही फोटो शेअर केले आहेत. मात्र, यावेळी चर्चा ही कतरिना आणि विकीची नाही तर तिच्या भावाची आहे. कतरिनाच्या भावाचे मन एका मराठी अभिनेत्रींने जिंकले आहे.

कतरिनाच्या लग्नानंतर तिचे भावंड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कतरिनाचा भाऊ Sebastien Laurent Michel ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मेंहदीच्या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये सेबॅस्टियनने शेअर केलेल्या फोटोत कतरिनाही बहीण इसाबेल आणि अभिनेत्री शर्वरी वाघसोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘माझं खरोखरच सुंदर कुटुंब आहे, फक्त बाहेरून नाही तर आतूनही सुंदर आहे. मी गेल्या जन्मात काही पुण्य केले असणार म्हणून मला हे कुटुंब मिळालं असणार…आणि शर्वरी खूप सुंदर आणि मस्त आहे.

आणखी वाचा : अभिषेकने बिग बींसोबत साम्य दाखवणारी पोस्ट केली शेअर, नेटकरी म्हणाले…

आणखी वाचा : ‘पुरुषांची घाणेरडी विचारसरणी…’, समांथा रुथ प्रभूच्या आयटम साँग विरोधात तक्रार दाखल

कोण आहे अभिनेत्री शर्वरी वाघ?

ज्येष्ठ शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे शर्वरीचे आजोबा. मनोहर जोशी यांची मुलगी नम्रता वाघ यांची मुलगी शर्वरी आहे. शर्वरीच्या वडिलांचं नाव शैलेश वाघ आहे. दरम्यान, शर्वरी बंटी और बबली २ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी याच्यासोबत दिसली.

Story img Loader