बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. एका बाजूस जिथे कलाकार आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधतात. तिथे दुसऱ्या बाजूस रणबीर कपूर आतापर्यंत कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नाही. तर कतरिना कैफ काही महिन्यांपूर्वीच फेसबूक आणि इन्स्टाग्रामशी जोडली गेली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतंच दोघांनी फेसबूक लाईव्हच्या माध्ममातून चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या लाईव्हदरम्यान कतरिना ऐश्वर्या राय बच्चनला असं काही बोलली, की ज्यामुळे ऐश्वर्याचे नाराज होणे स्वाभाविक असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणबीर आणि कतरिना ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनसाठी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत होते आणि यादरम्यान दोघांमध्ये गप्पा आणि छोटे-छोटे खेळसुद्धा रंगले. दोघांनी एकमेकांची खिल्लीसुद्धा उडवली आणि मस्करीही केली. हे खेळ खेळत असतानाच रॅपिड राऊंडमध्ये रणबीरने कतरिनाला एका जनावरासोबत कोणत्याही सेलिब्रिटीचे नाव जोडण्यास सांगितले आणि जेव्हा रणबीर कोल्हीण म्हणाला तेव्हा कतरिनाने लगेच ऐश्वर्याचं नाव घेतलं. आता कतरिना ऐश्वर्याला कोल्हीण का म्हणाली? याचे उत्तर तर ती स्वत:च देऊ शकेल.

याबरोबरच रणबीरने इतरही काही जनावरांची नावे घेतली. तेव्हा ऑस्ट्रिचसोबत कतरिनाने सोनम कपूरचं नाव जोडलं, बिबट्यासोबत टायगर श्रॉफचं नाव आणि माकडासोबत रणबीर कपूरचं नाव जोडलं. लाईव्हदरम्यान एका चाहत्याने रणबीर कपूरला जवळच्या पाच व्यक्तींची नावे घेण्यास सांगितली. याचे उत्तर देताना रणबीरने आई-बाबा, भाची समारा साहनी, अयान मुखर्जी यांची नावे घेतली आणि त्यानंतर कतरिनाकडे पाहून तो म्हणाला,’जर मी तुला खूश ठेऊ शकलो असतो तर, तुझंही नाव घेतलं असतं. मात्र असं होऊ नाही शकलं म्हणून तुझ्याऐवजी मी माझ्या दोन पाळीव कुत्र्यांची नावं घेतो.’

Father’s Day 2017 : सेलिब्रिटींचा ‘फादर्स डे’

रणबीर आणि कतरिनाचा ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट १४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटात रणबीर कपूर आपल्या वडिलांच्या शोधात असलेल्या गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी कतरिना रणबीरसोबत मिळून ‘जग्गा जासूस’चे प्रमोशन करणार नसल्याची चर्चा होती. मात्र आता तिने सर्व गोष्टी बाजूला सारत चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif called aishwarya rai bachchan fox during promotion of jagga jasoos on facebook with ranbir kapoor