‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाचा सातवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहेत. मोठमोठ्या स्टार्सनी या नवीन सीझनमध्ये हजेरी लावली आहे. हा कार्यक्रम बॉलिवूडमधल्या गॉसिपसाठी प्रसिद्ध आहे. आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रापासून सारा अली खान, जान्हवी कपूर अशा सध्याच्या नवीन पिढीच्या कलाकारांनी या कार्यक्रमात यावेळीस हजेरी लावली. आता या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात कतरिना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी हे दिसणार असून नुकताच या भागाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

हॉटस्टारच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये कतरिना, सिद्धांत आणि इशान हे तिघेही खूप धमाल करताना दिसत आहे. एकंदर या टीझरवरून कतरिनाने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केल्याचं स्पष्ट होत आहे. सध्या बॉलिवूडमध्ये बऱ्याच स्टार्सची लग्नं होत आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नानंतर सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची.

आणखी वाचा : अमिताभ बच्चन हे नाव आता ‘म्युझिक कंपोझर’ म्हणून झळकणार, दिग्दर्शक आर. बल्की यांनी केला खुलासा

आलियानेसुद्धा या सातव्या सीझनमध्ये हजेरी लावली तेव्हा तिने लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीविषयी खुलासा केला होता. तिचं म्हणणं असं होतं, लग्नाच्या पहिल्या रात्री सगळे थकून झोपतात त्यामुळे ‘सुहागरात’ ही संकल्पना ही भंपक कथा आहे. यासंदर्भात कतरिनाने नुकतंच या नवीन भागात खुलासा केला आहे. कतरिनाला करणने जेव्हा आलियाच्या या वक्तव्याविषयी विचारलं तेव्हा कतरिनाने अगदी हुषारीने याचं उत्तर दिलं. ती म्हणाली “सुहागरातच कशाला हवी, सुहागदिन सुद्धा तितकाच महत्वाचा असू शकतो.”

कतरिनाच्या या वक्तव्यावर करण आणि इतर दोघांनी तिची खिल्ली उडवली. एकूणच या कार्यक्रमाच्या येणाऱ्या भागात अशा बऱ्याच धमाल गोष्टी आणि गॉसिप अनुभवायला मिळू शकतात. कतरिना, सिद्धांत आणि इशान हे आगामी ‘फोन भूत’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हे तिघे प्रथमच एका चित्रपटात काम करत आहेत आणि त्याच निमित्ताने त्यांनी कॉफी विथ करणच्या या कार्यक्रमात हजेरी लावली होती. येत्या ८ सप्टेंबर रोजी हा भाग तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता.

Story img Loader