‘कॉफी विथ करण’चा सातवा सीझन दणक्यात सुरू आहे. मोठमोठे स्टार्स तसेच आजच्या पिढीचे कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावून एकमेकांची गुपितं उघड करत आहेत. करणला या कार्यक्रमावरून बरंच ट्रोल केलं जात असलं तरी त्याच्या या कार्यक्रमाची चर्चा सोशल मीडियावर कायम असते. कोणत्या सेलिब्रिटीने काय घातलं होतं? काय बोललं होतं? याची चर्चा सगळीकडेच होते. नुकतंच या कार्यक्रमाच्या पुढील भागात कतरिना कैफ हिने सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरबरोबर हाजेरी लावली.

या भागाचा टीझरदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या टीझरमध्ये कतरिनाने लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीविषयी एक मजेशीर खुलासादेखील केला होता. एकूणच या कार्यक्रमात कतरिनाला तिच्या आणि विकी कौशलच्या लग्नाबद्दल आणि नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले आणि कतरिनाने त्या प्रश्नांची अगदी मनमोकळेपणाने उत्तरं दिली.

कतरिना आणि विकी कौशल गेल्याच वर्षी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. अतिशय गोपनीयता बाळगून त्यांचा हा लग्नसोहळा संपन्न झाला. याबद्दल त्यांना प्रचंड ट्रोलही केलं गेलं. कॉफी विथ करणच्या या भागात कतरिनाने विकीविषयी खुलासा केला आहे. ती म्हणते “विकी का कधीच माझ्या रडारवर नव्हता. मला सर्वप्रथम त्याच्याविषयी काहीच ठाऊक नव्हतं. मी फक्त त्याचं नाव ऐकून होते. त्याच्याबरोबर काम करायची संधीसुद्धा मिळाली नव्हती. जेव्हा मी विकीला पहिल्यांदा भेटले तेव्हाच तो मला प्रचंड आवडला आणि मी याविषयी दिग्दर्शक झोया अख्तरला पहिले सांगितलं.”

आणखी वाचा : ‘कॉफी विथ करण’च्या नवीन भागात कतरिना कैफ म्हणते, “लग्नानंतरची पहिली रात्रच का? त्याऐवजी…”

पुढे कतरिना म्हणते की, “हा सगळा योगायोग होता आणि नशिबात लिहिलेलं तसंच झालं. सर्वप्रथम मला या सगळ्यावर विश्वासच बसत नव्हता. पण नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी समजायला लागल्या.” कॉफी विथ करणचा हा भाग ८ तारखेला डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader