बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ काही दिवसांपूर्वीच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. त्यानंतर ती सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. विकी आणि तिच्या लग्नाचे फोटो तर बरेच व्हायरल झाले होते. लग्नाच्या सर्व फोटोंमध्ये कतरिनाचं विकी कौशलच्या कुटुंबींयांसोबत असलेलं बॉन्डिंग पाहायला मिळालं. आता सोशल मीडियावरही असंच काहीसं चित्र आहे. कतरिना आणि विकीचा भाऊ सनी कौशल यांच्यात उत्तम बॉन्डिंग असल्याचं नेहमीच दिसून येतं. पण आता वहिनी कतरिनानं सनीच्या फोटोवर केलेली कमेंट विशेष चर्चेत आहे.
सनी कौशलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला होता. ज्या फोटोमध्ये तो मॉर्डन स्टाइलच्या एथनिक ड्रेसमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये सनी कौशलनं मॅचिंग चुडीदार, स्लीवलेस जॅकेट आणि मोजेक प्रिंट स्टोलसोबत एसिमेट्रिकल हेमलाइन कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, ‘एका राजासारखा रुबाब आणि योद्ध्याप्रमाणे पोषाख.’
सनी कौशलच्या या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण या फोटोवर त्याची ‘परजाईजी’ अर्थात वहिनी कतरिनानं कमेंट केल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या फोटोवर कमेंट करताना कतरिनानं लिहिलं, ‘वाइब है, वाइब है’ सनीनं विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नासाठी या लूकची निवड केली होती. या लूकमध्ये तो खूपच हॅन्डसम दिसत आहे.

दरम्यान कतरिना कैफ आणि विकी कौशल ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांचा हा शाही विवाहसोहळा सवाई माधोपुरच्या ‘सिक्स सेंसेज फोर्ट’मध्ये पार पडला होता. बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या लग्नांपैकी एक विकी आणि कतरिनाचं यांचं लग्न होतं. विकी आणि कतरिनाच्या लग्नानंतर सनीनं त्यांचा फोटो शेअर करताना ‘आमच्या कुटुंबात तुमचं स्वागत परजाईजी’ असं म्हणत कतरिनाचं स्वागत केलं होतं.