आपल्या विलक्षण नृत्यकौशल्याने बॉलीवूडमधला सर्वोक्तृष्ट नृत्यकलाकार म्हणून दखल घ्यायला लावणारा अभिनेता ऋतिक रोशन ‘बँगबँग’ चित्रपटात दिलखेचक नृत्याने पुन्हा एकदा आपली वेगळी छाप पाडण्याच्या तयारीत आहे. तर, या चित्रपटात ऋतिकसोबत नृत्य करणे हे मोठे आव्हान असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री कतरिना कैफने दिली आहे.
ऋतिकच्या नृत्यअदाकारीशी मिळतेजुळते नृत्य साकारणे अतिशय अवघड आहे. त्याच्यासोबत नृत्य करणे मोठे आव्हान असून त्याची नृत्यातील लवचिकता थक्क करणारी आहे. त्यामुळे त्याच्यासोबत नृत्य करणे म्हणजे तारेवरची कसरत असते असे कतरिना म्हणाली.
“चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान ऋतिक सेटवर नसतेवेळी सराव करत असताना मी उजवी ठरते पण, चित्रीकरण सुरू झाले की उत्तम कोण करतयं हे सर्वांच्या आपोआप ध्यानी येते. त्याची नृत्यकला सर्वोत्कृष्ट आहे” असेही ती पुढे म्हणाली.
दिग्दर्शक सिध्दार्थ राज आनंद दिग्दर्शित बहुप्रतिक्षीत बँगबँग चित्रपट येत्या २ ऑक्टोबरला ‘बँग बँग’ चित्रपटगृहात दाखल होत आहे. हा चित्रपट ‘नाईट अँड डे’ या हॉलीवूडपटाचा अधिकृत रिमेक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा