बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आई-बाबा झाले आहेत. आलियाने आज दुपारी १२ च्या सुमारास एका गोड मुलीला जन्म दिला. गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात तिची प्रसूती सुखरुपपणे पार पडली. या बातमीनंतर सिनेसृष्टीसह तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच आलिया-रणबीर दोघेही फार आनंदात असल्याचे दिसत आहे. आलियाने बाळाला जन्म दिल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आलियाच्या या पोस्टवर रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडनेही प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या कमेंट्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
आलिया भट्टने तिच्या बाळाच्या जन्मानंतर इन्स्टाग्रामवर एक छानशी पोस्ट लिहिली होती. या पोस्टला तिने फक्त हार्ट शेअर करत कॅप्शन दिले होते. यात तिने सिंहाच्या कळपाचा फोटो शेअर करत त्याखाली गुडन्यूज शेअर केली होती. “आणि आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बातमी म्हणजे आमच्या बाळाचा जन्म झाला आणि ती एक मुलगी आहे. ती आमचं प्रेम आहे. आम्हाला तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की आम्ही पालक झालो आहोत. खूप खूप प्रेम -आलिया-रणबीर”, असे तिने या फोटोत म्हटलं होतं.
आणखी वाचा : “मुलगी होण्यापेक्षा…” आलिया भट्टच्या पोस्टनंतर अक्षय कुमारचा रणबीर कपूरला सल्ला
त्यावर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आलियाच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. खूप खूप शुभेच्छा असे दीपिकाने कमेंट करताना म्हटले आहे. तर अभिनेत्री कतरिना कैफ हिने ही यावर कमेंट करत उत्तर दिले आहे. तिनेही त्यावर खूप शुभेच्छा अशी कमेंट केली आहे. त्या दोघींच्याही कमेंट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा : Alia-Ranbir Blessed with Baby Girl : आलिया-रणबीर झाले आई-बाबा, कपूर कुटुंबात छोट्या परीचं आगमन
दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे आज (६ नोव्हेंबर) सकाळी ७.३० वाजता गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात पोहोचले होते. ते पहिल्या बाळाच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहितीही समोर येत होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासातच तिला प्रसूती कळा सुरु झाल्या. यानंतर दुपारी १२ ते १२.३० वाजता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. रणबीर कपूरची बहिण रिद्धीमा कपूर हिने या बातमीवर शिक्कामोर्तब केले होते.