गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. एवढंच काय तर काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपूडा झाल्याचे म्हटले जात होते. तर आता डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या लग्नाची तयार सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, कतरिनाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कतरिनाने बॉलिवूड लाइफला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी कतरिनाने या सगळ्या अफवा आहेत असं म्हणतं सांगितलं की, “हा प्रश्न गेल्या १५ वर्षांपासून मला विचारला जातो.” कतरिनाचा लेहेंगा हा लोकप्रिय फॅशन डिझायनर सब्यासाची डिझाइन करत असल्याच्या चर्चा होत्या. कतरिना आणि विकी दोघेही त्यांच्या लग्नाचे कपडे फायनल करत आहेत आणि त्यांचे लग्न हे राजस्थानमध्ये होणार असल्याच्या या सगळ्या अफवा असल्याच्या बॉलिवूड लाइफने दिलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा : ५ हजार कोटी रुपयांचा मालक असूनही ‘या’ कारणामुळे मुलांना एक रुपयाही देऊ शकत नाही सैफ

सुत्राने त्यांना ही माहिती दिली की, हे सगळं खोटं आहे. या दोघी कलाकारांची अशी कोणतीही योजना नाही. तर कतरिना आणि विकी विषयी अशा अफवा पसरवण्याचा जणू काही ट्रेंड गेल्या काही महिन्यांपासून सुरु झाला आहे.

आणखी वाचा : “चोराला सोडून संन्याशाला फाशी…”,समीर वानखेडे यांच्या प्रकरणात मेघा धाडे संतापली

आणखी वाचा : Photo : ‘मुळशी पॅटर्न’चे चाहते जेव्हा ‘अंतिम’चा ट्रेलर बघतात तेव्हा…, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

दरम्यान, कतरिनाने नुकतीच सरदार उधम सिंग या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. सरदार उधम या चित्रपटात विकीने मुख्य भूमिका साकारली आहे. तर कतरिना लवकरच सुर्यवंशी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कतरिना ही अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif denies news of december wedding with vicky kaushal dcp