सध्या रणबीर कपूर आणि कतरिनाच्या प्रेमसंबंधांच्या चर्चेला उधाण आले आहे. पण, दोघांनीही आपल्यामध्ये अशाप्रकारचे कोणतेही संबंध असल्याचे मान्य केलेले नाही. दरम्यान, सोशल साइट्सवर या दोघांचे एकत्रित फोटो प्रदर्शित झालेले आहेत.
नुकतेच, लंडन दौ-यावर कतरिना, रणबीर आणि त्याची आई नीतू सिंग या तिघांना एकत्र हॉटेलमध्ये डिनर करताना पाहिले गेले होते. कतरिना तिच्या परिवारास भेटण्यास लंडनला गेली असतानाच रणबीरसुद्धा त्याच्या ‘ये जवानी है’ दिवानी चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता तेथे गेला होता. ‘धूम ३’च्या शूटिंगमधून वेळात वेळ काढून कतरिना रणबीरला भेटायला गेली होती. तसेच, काही दिवसांपूर्वी दोघे एकत्र मध्यरात्री रिक्षा स्वारीचा आनंद घेतानाही आढळले होते.
रणबीरचे दीपिका पादुकोणसोबत प्रेमसंबंध होते आणि ते २०१० साली वेगळेही झाले. यावेळेस नीतू सिंगचे कतरिनाशी चांगलेच जुळत असल्याचे दिसत आहे.

Story img Loader