बॉलिवूड अभिनोत्री कतरिना कैफ सध्या अत्यंत व्यस्त आहे. कतरिनाच्या तारखांच्या नोंदवहीनुसार तिच्याकडे एकही दिवस रिकामा नाही. त्यामुळे कतरिना चक्क शाहरूख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ला नाही म्हणाली आहे.  
 कतरिनाने नव्या दोन चित्रपटांशी करार केला आहे. चार्ल्स डिकेन्सच्या कादंबरिवर आधारीत कबीर खानचे दिग्दर्शन व साजिद नाडिआदवालाची निर्मिती असलेल्या चित्रपटाकडून कतरिनाला खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटामध्ये कतरिनासोबत सैफ अली खान व अभिषेक कपूरची देखील भूमिका आहे. त्यामुळे कतरिनाला यावर्षी तरी शाहरूखसाठी वेळ नाही.
“कतरिनाला फराहचा चित्रपट  करायला आवडले असते. मात्र, सुरूवातीला आम्हाला असे समजले होते की, फराह ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटासाठी एकदम नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे. जेव्हा फराहने कतरिनाला ‘हॅपी न्यू इयर’साठी विचारणा केली त्यावेळी तिने दोन चित्रपटांशी आधीच करार केलेला होता. कतरिना व फराहचे संबंध अतिशय चांगले असून, तिच्या ‘तिस मार खाँ’ मध्ये कतरिनाने आयटम साँग केले होते. ‘तिस मार खाँ’ च्या अपयशाने त्यांच्या मैत्रीमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. ‘जबतक है जान’मध्ये शाहरूख आणि कतरिनाने एकत्र काम केले आहे. तिला शाहरूख सोबत ‘हॅपी न्यू इअर’मध्ये काम करायला आवडले असते. परंतू, विजय कृष्ण आचार्यच्या ‘धूम३’च्या चित्रिकरणाचे काम संपवण्यावर तिने भर दिला आहे, असे तिच्या मैत्रीणीने सांगितले आहे.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा