देशभरात करण्यात आलेल्या एका मतचाचणीद्वारे बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला भारतातील सर्वात सुंदर स्त्रीचा पुरस्कार देण्यात आला. आत्तापर्यंत कतरिनाला तिच्या हॉट लुकमध्ये पाहिले गेले आहे. परंतु, आता आपल्या या नाजूक दिसण्याला मागे सारत ‘बँग बँग’ आणि ‘जग्गा जासूस’ या आगामी चित्रपटांसाठी कतरिनाने जीममध्ये घाम गाळत लवचिक बांधा कमवला आहे. ज्या योगे चित्रपटातील आव्हानात्मक हाणामारीची दृष्ये ती लिलया करू शकेल. ‘जग्गा जासूस’साठी कतरिना आपल्या फिटनेसवर कमालीची मेहनत घेत आहे. सदर चित्रपटाचे चित्रीकरण साऊथ अफ्रिकामध्ये सुरू आहे. बॉलिवूडमध्ये लकी मॅस्कॉट म्हणून समजली जाणारी कतरिना आपल्या प्रत्येक भूमिकेवर मेहनत घेते. सध्या रजाच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेत आहे. व्यायामादरम्यान कतरिनाच्या दोन्ही खांद्यांना दुखापत झाली होती. डोक्टरांनी तिला खांद्यांवर जोर न टाकता हलका व्यायाम करण्याचा सल्ला दिला होता. सध्या कतरिना साऊथ आफ्रिकामध्ये चित्रीकरणात व्यस्त आहे. तिला आराम करण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु, कामात व्यस्त असलेल्या कतरिनाला ते शक्य झाले नाही.
‘बँग बँग’ आणि ‘जग्गा जासूस’साठी कतरिनाचा लवचिक बांधा
देशभरात करण्यात आलेल्या एका मतचाचणीद्वारे बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला भारतातील सर्वात सुंदर स्त्रीचा पुरस्कार देण्यात आला. आत्तापर्यंत कतरिनाला तिच्या हॉट लुकमध्ये पाहिले गेले आहे.
First published on: 28-05-2014 at 05:12 IST
TOPICSकतरिना कैफKatrina KaifबॉलिवूडBollywoodहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif in bang bang and jagga jasoos