गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर हे दोघे लग्नबंधनात अडकले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे त्यांनी लग्न केले. या सोहळ्यासाठी अनेक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली. त्यांच्या या लग्नाच्या खर्चाचा मोठा भार हा कतरिनाने उचलला होता. कतरिनाने त्यांच्या लग्नातील खर्चाचा जवळपास ७५ टक्के खर्च कतरिनाने केला आहे.

कतरिना आणि विकी यांच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या वृत्तानुसार या राजेशाही थाटामाटात झालेल्या लग्नाचा ७५ टक्के खर्च हा कतरिनाने केला आहे. एवढचं काय तर लग्नासाठी देण्यात आलेल्या बऱ्याच चेकवर कतरिनाची सही आहे. यात त्यांच्या लग्नातील डेकोरेशपासून, लग्नासाठी जागा शोधेपर्यंत आणि प्रवास, पाहुण्यांची सगळी सोय पर्यंतचा सगळा खर्च हा कतरिनाने केल्याचे म्हटले जातं आहे. मात्र, या दोघांनी अजून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आणखी वाचा : पहिल्यांदा वडिलांनीच दिला होता मद्याचा ग्लास आणि ४ बॉयफ्रेंड ठेवण्याचा सल्ला, ट्विंकलने केला होता खुलासा

आणखी वाचा : पहिल्या भेटीच्या वेळी अभिषेकला बोलताना पाहून ऐश्वर्याची होती अशी प्रतिक्रिया

कतरिना आणि विकी ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न बंधनात अडकले आहेत. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने, कोणतीही गोष्ट जाहीर न करता, अगदी कडक नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला. पंजाबी पद्धतीने त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नासाठी पाच मजल्यांचा केक एका इटालियन शेफकडून बनवून घेण्यात आला असून भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही पद्धतींचे स्वादिष्ट पदार्थ पाहुण्यांसाठी ठेवण्यात आले आहेत. या दोघांच्याही चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

Story img Loader