अभिनेत्री कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये वीस वर्षे पूर्ण होत आहेत. तिने हळुहळू मोठा पल्ला गाठला आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले. अक्षय कुमार, सलमान खान, हृतिक रोशन आणि रणबीर कपूर यांसारख्या स्टार्ससोबत तिने केलेला चित्रपट प्रवास आता ‘फोन बुथ’पर्यंत येऊन पोहोचला आहे. या चित्रपटात ती सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर या अभिनेत्यांबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान, कतरिनाने विक्की कौशलशी लग्न केले आणि गेले काही दिवस प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगली आहे. चित्रपट क्षेत्रात काम करताना असे अनेक चढ उतार तिने अनुभवले. हे सगळे अनुभव ती तिच्या आत्मचरित्रातून सर्वांसमोर घेऊन येणार आहे.

आणखी वाचा : “एखाद्या गाण्याचे रिमिक्स करणारे तुम्ही कोण?”, ए. आर. रहमान संतापले

poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Premachi Goshta marathi Serial completed 450 episode Apurva nemlekar share special post
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने गाठला ४५० भागांचा टप्पा, कलाकारांनी ‘असं’ केलं जंगी सेलिब्रेशन
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Marathi actress Tejashri Pradhan says May I get an Oscar sometime in my life
“मला कधी तरी आयुष्यात ऑस्कर मिळो…” म्हणत तेजश्री प्रधानने सांगितली तिची हळवी जागा, म्हणाली…
Marathi Actress tejashri Pradhan want to again play rj role in asehi ekda vhave movie
तेजश्री प्रधानला ‘ही’ भूमिका पुन्हा एकदा जगायला आवडेल, म्हणाली, “तेव्हा मला…”
Bhagyashree Fund , Maharashtra Kesari,
पुण्याची भाग्यश्री फंड महाराष्ट्र केसरी, म्हणते ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे ध्येय
एडम जे ग्रेव्स आणि सुचित्रा मट्टई यांनी दिग्दर्शित केलेल्या'अनुजा'मध्ये एका ९ वर्षीय मुलीची कथा आहे. (Photo Credit - Youtube Screen Shot)
खऱ्या आयुष्यात केली बालमजुरी, आता थेट Oscar नॉमिनेटेड शॉर्ट फिल्ममध्ये ‘ही’ मुलगी साकारतेय मुख्य भूमिका; जाणून घ्या सजदा पठाणची गोष्ट

कतरिनाबद्दल एक बातमी समोर आली आहे. ती तिच्या चित्रपट कारकिर्दीवर पुस्तक लिहिण्याच्या तयारीत आहे. तिच्यासाठी तिच्या चित्रपट कारकीर्दीचा वीस वर्षांचा कालावधी खूप मोठा आहे. जर कतरिनाने तिच्या चित्रपट प्रवासाबद्दल पुस्तक लिहिलं तर सलमान खान आणि रणबीर कपूर यांच्यासह अनेक कलाकरांचा उल्लेख त्यात केला जाईल. कतरिनाने सलमान आणि रणबीर या दोघांसोबत अनेक चित्रपट केले आहेतच पण त्यांच्याबरोबर तिचे प्रेमसंबंधही होते.

कतरिना एकेकाळी रणबीर कपूरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. तर सलमान खानचेही एकेकाळी कतरिनावर प्रेम होते. सलमानने आजपर्यंत लग्न केले नाही, तर रणबीर आता आलिया भट्टसोबत लग्न करून सुखी आयुष्य जगत आहे. अशा परिस्थितीत कतरिनाने तिच्या चित्रपट प्रवासावर एखादे पुस्तक लिहिले आणि त्यात तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलकही दिसली तर या दोघांचेही नाव या पुस्तकात नक्की येईल. त्यामुळे कतरिना, सलमान आणि रणबीर यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : कतरीना आणि विकीच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन ? क्लिनिकबाहेरचे फोटो व्हायरल

दरम्यान, कतरिनाने डिसेंबर २०२१ मध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसह लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. विकी-कतरिना ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. कतरिना लवकरच ‘फोन बुथ’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटातही ती दिसणार आहे.

Story img Loader