बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच कतरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये कतरिना प्रेग्नेंट आहे का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
कतरिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत कतरिनाने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कतरिना प्रग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘ती प्रेग्नेंट असल्यासारखी का दिसते?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ती प्रेग्नेंट आहे.’ तिसरा नेटकरी आनंदी असल्याचे दाखवत म्हणाला, ‘कतरिना प्रेग्नेंट’

विकी आणि कतरिना ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नात फक्त कुटूंबातील सदस्यांनी आणि जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. कतरीनाने तिच्या लग्नात लाल रंगाचा लहेंगा परिधान केला होता. त्या दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.