katrina-kaif-450बॉलिवूडची बार्बी डॉल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कतरिना कैफची छायाचित्रे मनमोहक असतात. फोटोशूट करताना कॅमऱ्यालादेखील भुरळ पडावी, अशा या लावण्यवतीने अलीकडेच एका साबणाच्या ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले. हे फोटोशूट नेहमीप्रमाणे नसून खास होते. २०१४ साली भावेश पटेल या अंध छायाचित्रकाराला कतरिनाची छायाचित्रे काढण्याची संधी देण्यात आली. भावेश पटेलने केलेले कतरिनाचे फोटोशूट खचितच सुंदर झाले आहे. कतरिनाची अनेक सुंदर छायाचित्रे काढलेल्या भावेशचे छायाचित्रणातील कौशल्य अचंबित करणारे आहे. खुद्द कतरिनादेखील भावेशने काढलेली तिची सुंदर छायाचित्रे पाहून भारावून गेली. स्त्रीचे सौदर्य हे केवळ दिसण्यात नसून, तिच्या स्त्रीपणात असल्याचे भावेशचे मानणे आहे. या फोटोशूटचा भावस्पर्शी व्हिडिओसुद्धा तयार करण्यात आला आहे.

katrina-kaif-450akatrina-kaif-embed-450

Story img Loader