तिने सुपर हीट चित्रपट देण्याचा मान मिळविला असल्याचे म्हणत आपल्या नावावर अनेक हीट चित्रपट आसलेल्या आमिर खानने आजच्या जमान्यातील कतरिना कैफची मोकळेपणाने प्रशंसा केली. पुढील महिन्यात चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या ‘धूम ३’ या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात आमिर आणि कतरिना पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. जर कतरिना चित्रपटात असेल, तर चित्रपट यशस्वी झालाच पाहिजे असे मला ‘धूम ३’ चित्रपट स्वीकारण्याच्या वेळी सांगण्यात आल्याचे आमिर म्हणाल. दशकभरापूर्वी बॉलिवूडमध्ये प्रवेश करून, यशाच्या शिखरावर पोहचलेली कतरिना आमिरपेक्षा उंचीने जास्त आहे. परंतु, याविषयी आमिरची कोणतीच तक्रार नाही. याबाबत बोलतांना आमिर म्हणाला, तिच्या उंचीविषयी मला काहीही अडचण नव्हती… मी कधीच तिला हिल्सच्या चपला काढायला सांगिले नाही. आपल्याला उंच स्त्रिया आवड असल्याचे देखील आमिर म्हणाला. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित ‘धूम ३’ चित्रपटात आमिर आणि कतरिना परस्परविरोधी भूमिका करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा