गेल्या वर्षभरापासून कतरिनाचा एकही चित्रपट झळकला नसला तरी बॉलिवूडच्या या सौंदर्यवतीला या वर्षीचा ‘वर्ल्डस् सेक्सिएस्ट एशियन वुमन’चा मान पटकवण्यापासून कोणीही रोखू शकलेले नाही. कतरिनाने चौथ्यांदा हा मान मिळवला आहे. ‘युके’तील ‘इस्टर्न आय’ या साप्ताहिकाद्वारे याबाबतची मतचाचणी घेण्यात येते. प्रियांका चोप्रा, टिव्ही स्टार द्रष्टी धामी आणि सध्याची बॉक्स ऑफिस क्वीन दीपिका पदुकोणला मागे सारत कतरिनाने ‘वर्ल्डस् सेक्सिएस्ट एशियन वुमन २०१३’ च्या ५० प्रसिध्द महिलांच्या यादीत प्रथम येण्याचा मान मिळवला. या यादीत प्रियांका चोप्रा दुसऱ्या तर दीपिका चौथ्या स्थानावर आहे. कतरिनाचा ‘धूम ३’ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतांनाच तिने चौथ्यांदा हा मान पटकावल्याची आनंदवार्ता प्रसिध्द झाली आहे. या विषयी बोलतांना कतरिना म्हणाली, हे रेकॉर्ड असल्याचे मला माहित नव्हते. माझ्यासाठी हे सुखद आश्चर्य असून, ऐकून मजा वाटली. लंडनमधील माझ्या बहिणी ‘इस्टर्न आय’ वृत्तपत्र वाचत असल्याने मला मिळालेला हा मान खूप भावला. हा मान मिळणे ही खूप सुंदर घटना असली तरी लोक जे पाहातात त्यावर प्रतिक्रिया देतात.
सर्वांनी मला सकाळी उठलेल्या आवतारात पाहिले असते किंवा ट्रॅक पॅन्टमध्ये पाहिले असते आणि नंतर मला मत दिले असते, तर कदाचीत थोड्या जास्त प्रमाणात यावर माझा विश्वास बसला असता. तरी सुध्दा नक्कीच ही एक आनंददायी बाब असल्याचे कतरिना म्हणाली.

Story img Loader