गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. एवढंच काय तर काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाल्याचे म्हटले जात होते. तर आता डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या लग्नाची तयार सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. कतरिना आणि विकी कौशल राजस्थानमध्ये भव्यदिव्य पद्धतीने लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र कतरिनाने काही दिवसांपूर्वी या सगळ्या अफवा आहेत, असं सांगत यावर पूर्णविराम दिला होता. पण तिचे लग्न न करण्यामागचे मुख्य कारण बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार असल्याचे बोललं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बॉलिवूड लाईफ’ या वेबसाईटने दिलेल्या एका वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ आणि विकी कौशल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचेही बोललं जात आहे. मात्र कतरिना ही अक्षय कुमारमुळे लग्नाची घोषणा करत नसल्याचे बोललं जात आहे.

कतरिना ही गेल्या काही दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट सूर्यवंशीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सूर्यवंशी चित्रपटात अक्षय कुमार हा मुख्य भूमिकेत असल्यामुळे सध्या तोही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे.

पण सूत्रांच्या माहितीनुसार, कतरिनाने सूर्यवंशी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जर लग्नाची घोषणा केली तर प्रसारमाध्यमांचा संपूर्ण लक्ष हे अक्षय कुमार किंवा सूर्यवंशी चित्रपटावरुन कमी होईल. त्यामुळे निर्मात्यांना प्रचंड नुकसान होऊ शकते. विशेष म्हणजे कतरिनाच्या लग्नाच्या चर्चांमुळे सध्या सूर्यंवशी चित्रपट किंवा अक्षय कुमार यांची फार कमी चर्चा होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत निर्मात्यांना कोणताही धोका पत्करायचा नाही. याच कारणामुळे कदाचित कतरिना लग्नाबद्दल बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आता अखेर ५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif not announce her wedding with vicky kaushal due to this actor nrp