अलिकडेच कतरिना आणि रणबीर स्पेन येथे सुटीनिमित्त एकत्रित असतानाच्या छायाचित्रांवरून वादाचे मोहोळ उठले होते. सध्या बॉलिवूडची ही बार्बी डॉल रणबीरसोबत लंडनमध्ये सुटी घालवत असल्याच्या वावड्या उठत आहेत. प्रत्यक्षात मात्र ती सैफ अली खानबरोबर एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. कतरिना रणबीरबरोबर सुटीवर असल्याच्या बातम्या खोट्या असून, अशाने तिच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचे कतरिनाच्या मैत्रिणीने सांगितले. ती म्हणाली, आपल्या प्रियकराच्या मागे मागे सगळीकडे जाणा-यांपैकी कतरिना निश्चितच नाही. आपली अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तिला चीड आहे. रणबीरबरोबर सुटी घालवत असल्याच्या वृत्ताचे खंडण करत ती म्हणाली, नुकताच कतरिनाने ‘धुम-३’ चित्रपट पूर्ण केला. आता ती नव्या कामासाठी सज्ज झाली असून, कबीर खानच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला अतिशय थरारक स्टंट करावे लागणार आहेत. बोरूटमध्ये सैफ अली खानबरोबर ती यासाठीचे प्रशिक्षण घेते आहे.

संबधीत बातम्या –

ऑक्टोबर महिन्यात कतरिना बोरूटसाठी रवाना झाली आणि २० ऑक्टोबरला चित्रपटाचे शुटिंग सुरू झाले.
याआधी अफगाणिस्तानमध्ये चित्रीकरण केलेल्या कबीर खानने यावेळीसुद्धा रखरखीत वाळवंटी पार्श्वभूमी असलेल्या लोकेशनलाच पसंती दिली. पाठीच्या दुखापतीतून सावरत असलेला निर्माता साजिद नाडियादवाला लवकरच सैफ, कतरिना आणि कबीर खानला भेटण्यासाठी बोरूटला जाणार आहे. सलमान खानचा जवळचा मित्र असलेला साजिद आणि कतरिना मानलेले भाऊ-बहिण आहेत. साजिद आणि कतरिना पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत.

Story img Loader