रणबीर आणि कतरिना सुट्टीची मजा घेत असतानाचे खासगी क्षणांचे फोटो माध्यमांत प्रसिद्ध झाल्याने कतरिना माध्यमांवर भडकली होती. या विषयीची आपली नाराजी तिने लेखी निवेदनाद्वारे माध्यमांना कळवली होती. आता पुन्हा एकदा ‘धूम ३’ चित्रपटातील गाण्याच्या अनावरणाच्या वेळी माध्यामांच्या प्रतिनिधींनी याच विषयावर तिला छेडले असता ती म्हणाली, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सर्वजण अशाप्रकारचे फोटो काढणार असाल, तेव्हा मला अधी कल्पना द्या, म्हणजे मी मॅचिंग बिकनी घालण्याची काळजी घेईन. पांढऱ्यावर लाल रंग शोभून दिसत नाही.
कतरिना म्हणाली, गेल्या नऊ वर्षांत माझ्याबरोबर असे कधीच झाले नव्हते. कोणीतरी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याची माझी भावना होती. माध्यमांनी केलेले बरोबर असले, तरी या घटनेमुळे मी व्यथित झाले होते, त्यामुळे यावरची माझी प्रतिक्रिया देखील योग्य होती.

Story img Loader