बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे तथाकथीत प्रेमीयुगल आतापर्यंत त्यांच्यातील जिव्हाळ्याच्या संबंधांचा इन्कार करीत आले आहेत. पण, नुकतेच एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळाला कतरिनाने दिलेल्या मुलाखतीत रणबीर सोबतच्या नात्यावरून विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली.
ती म्हणाली की, “रणबीर माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा व्यक्ती आहे पण, सध्यातरी मी विवाह करण्याचा विचारात नाही. मी नेहमी माझ्याशी निगडीत कोणत्याही नात्याबद्दल क्वचितच बोलते. माझ्या करिअरच्या उमेदिच्या काळातच मी विवाह करण्याची घाई न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विवाह करण्याचा सध्यातरी माझा कोणताही प्लॅन नाही.” असेही ती पुढे म्हणाली.
तसेच काही महिन्यांपूर्वी कतरिनाचे रंगभूषाकार डॅनियल बॉयर हे वेशभूषा आणि रंगभूषाकार असोसिएशनचे सदस्य नसल्याने फिल्मसीटीमध्ये झालेल्या वादात सलमानने मदत केल्याच्या वृत्तावरही कतरिनाने यावेळी स्पष्टीकरण दिले. ती म्हणाली की, “माझे रंगभूषा आणि केशरचनाकार हे व्यवस्थापकीय टीम निवडते. माझा रंगभूषाकार परदेशी आहे आणि त्यांच्याकडे युनियन कार्डही होते. ते पुरेसे ठरेल असे वाटले परंतु, काही संस्थांनी यावर आक्षेप नोंदवत निषेध व्यक्त केला. काहीवेळानंतर, प्रश्न सोडविण्यात देखील आला. सलमानचे कुटुंबियांशी नेहमी माझी जवळीक राहीली आहे आणि यापुढे राहतील अशी आशा आहे. मी नेहमी सलमानला मदतीसाठी फोन करत नाही.” असेही कतरिनाने सांगितले

Story img Loader