बॉलीवूडमधील हॉट जोडी रणबीर आणि कतरिना त्यांच्या कामामधून वेळ काढून युरोपला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. रणबीर-कतरिना युरोपला सुट्टी साजरी करण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीची युरोपमध्ये भेट घेणार आहेत. अयान त्याच्या मित्रमंडळींसोबत युरोपला गेला आहे.
रणबीर आणि कतरिना हे अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीमध्येही एकत्र दिसले होते. मात्र, आमच्या दोघांमध्ये  केवळ मैत्रीपूर्ण असल्याचे कतरिनाचे म्हणणे आहे. ‘धूम ३’च्या चित्रिकरणावेळी झालेल्या दुखापतीमुळे सध्या कतरिनाने चित्रिकरणातून सुट्टी घेतली आहे. तर रणबीरने ‘बेशरम’ चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच पूर्ण केले आहे.

Story img Loader