बॉलिवूडमधील बहुचर्चित कथित प्रेमीयुगुल कतरिना कैफ आणि रणबीर कपूरने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदिवला प्रयाण केले. मालदीव येथे विमानतळावर उतरतानाची दोघांची छायाचित्रे इंटरनेटवर प्रसिद्ध झाली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दोघेजण आपापल्या कामात व्यस्त होते. कतरिना ‘फितूर’ आणि ‘जग्गा जासूस’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती, तर रणबीर कपूर ‘बॉम्बे वेलवेट’ आणि ‘तमाशा’ चित्रपटासाठी चित्रीकरण करत होता. याआधी स्पेनमध्ये सु्ट्टीचा आनंद घेतानाची या दोघांच्या छायाचित्रांनी एकच खळबळ उडवून दिली होती. अलीकडेच रणबीर आणि कतरिनाने रणबीरच्या कुटुंबीयांसमवेत डिनरचा आनंद घेतला, यावेळी रणबीरची आई नितू सिंग, काका रणधीर कपूर आणि आजी उपस्थित होते.
कतरिना-रणबीर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदिवमध्ये
बॉलिवूडमधील बहुचर्चित कथित प्रेमीयुगुल कतरिना कैफ आणि रणबीर कपूरने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदिवला प्रयाण केले.
First published on: 22-04-2015 at 02:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif ranbir kapoor head to maldives for summer break