बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर दोघांचाही बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या पोस्ट, फोटो किंवा व्हिडीओ अनेकदा व्हायरल होताना दिसतात. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी लग्न केलं आणि आता कतरिनाच्या आयुष्यात ‘ती’ची एंट्री झाल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर विकी कौशलसोबतच्या तिच्या फोटोवर कतरिनानं कमेंट देखील केली आहे. कतरिनाच्या या पोस्टवरील कमेंटनंतर विकीच्या आयुष्यातील तिला कतरिनाची सवत म्हटलं जातंय.
कतरिना आणि विकीच्या आयुष्यातील ‘ती’ दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान आहे. फराह खान नेहमीच बॉलिवूडमधील अभिनेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आता फराह खाननं विकी कौशलसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या मजेदार कॅप्शनमुळे फराह कतरिनाची सवत म्हटलं जात आहे. हा फोटो कतरिनानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यावर कमेंट केली आहे.
फराह खाननं शेअर केलेल्या विकी कौशलसोबतच्या फोटोमध्ये कतरिनाला टॅग करताना लिहिलं, ‘कतरिना कैफ माफ कर पण विकीला कोणीतरी दुसरी भेटली आहे.’ कतरिनानं हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रिशेअर करताना लिहिलं, ‘तुला याची परवानगी आहे.’ यासोबत कतरिनानं हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे. दरम्यान कतरिना आणि फराहची ही क्यूट केमिस्ट्री सर्वांना आवडली असून यावर चाहत्यांनी धम्माल कमेंट केल्या आहेत.