बॉलिवूडच्या सेलिब्रिटी कपलपैकी आणखी एक सतत चर्चेत असणारं कपल म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशल. कतरिना-विकीने लग्न करत सगळ्यांना सुखद धक्काच दिला. त्यांचं लग्न म्हणजे चाहत्यांसाठी मोठं सरप्राईजचं होतं. कतरिना-विकी यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केलं आणि अखेरीस लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर दोघंही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. या दोघांचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कतरिना-विकी सध्या एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेले दिसत आहेत. दोघंही एकमेकांबरोबर एकत्रित वेळ घालवताना दिसतात. कतरिनाने नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघं स्विमिंग पूलमध्ये पोझ देताना दिसत आहेत. कतरिना-विकीचा हा सगळ्यात हॉट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा – VIDEO : आली लहर केला कहर; सोनमने गरोदरपणात हॉटेलमध्ये जाऊन स्वतःच बनवला खास पदार्थ

कतरिनाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस तर विकीचा शर्टलेस लूक या फोटोमध्ये दिसत आहे. कतरिनाने हा फोटो शेअर करताच काही मिनिटांमध्येच फोटोला हजारो लाईक मिळाले आहेत. तर अनेकांनी सगळ्यात हॉट कपल म्हणून कमेंट देखील केल्या आहेत. अनेक सेलिब्रिटी मंडळींनी देखील दोघांच्या या फोटोला पसंती दर्शवली आहे.

आणखी वाचा – Photos : साऊथच्या चित्रपटांना टक्कर देणार बॉलिवूडचे ‘हे’ ५ चित्रपट, बॉक्स ऑफिसवर कमावणार कोट्यावधी रूपये

कतरिना-विकी यांचा हा नवा रोमँटिक अंदाज खरंच लक्ष वेधून घेत आहे. दोघंही सध्या त्यांच्या सुखी संसारामध्ये रमले आहेत. त्याचबरोबरीने या दोघांच्या हाती बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट आहेत. कतरिना ‘भूत पुलिस’, ‘मेरी क्रिसमस’ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर विकी सारा अली खानबरोबर चित्रपट करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif share romantic photo on instagram with husband vicky kaushal from swimming pool kmd