बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. एकीकडे ती लवकरच आई होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे तिच्या आगामी चित्रपटांबद्दल तिचे चाहते उत्सुक आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कतरिना अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडे, तिने शेअर केलेले काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत धुमाकूळ घालत आहेत.
आणखी वाचा : करीना कपूर, अर्जुन कपूर होत आहेत ट्रोल, तर शाहरुखचं होतंय कौतुक.. जाणून घ्या कारण
तिने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये कतरिना कैफ एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. कतरिनाच्या या पोस्टमध्ये तिच्यासोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेता ईशान खट्टरही दिसत आहेत. नुकतेच हे तिघे एकमेकांना भेटले आणि त्यावेळी त्यांनी केलेली मजा मस्ती या फोटोंमध्ये आणि व्हिडीओमध्ये दिसत आहे. चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटीही या फोटोंवर कमेंट्स करताना दिसत आहेत. या फोटोसोबत कतरिनाने एक व्हिडिओही शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कतरिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बॅक विथ माय फोन भूत बॉईज.’
या तिघांच्या लूकबद्दल बोलायचे तर, कतरिनाने फ्लोरल प्रिंटचा कलरफुल ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत आहे. तर सिद्धांत चतुर्वेदी ग्रे टी-शर्टमध्ये तर इशान खट्टर काळ्या आणि राखाडी टी-शर्टमध्ये दिसत आहे.
हेही वाचा : कतरीना आणि विकीच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन ? क्लिनिकबाहेरचे फोटो व्हायरल
या चित्रपटाच्या माध्यमातून कतरिना कैफ लग्नानंतर पहिल्यांदाच ‘फोन भूत’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्याबरोबर सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरही महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. कतरिनाचा हा बहुप्रतीक्षित चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय कतरिना ‘टायगर 3’ आणि ‘मेरी ख्रिसमस’ या दोन चित्रपटांमध्येही प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.