चित्रपटगृहांमधून दाखवण्यात येणाऱ्या ‘धूम ३’च्या प्रोमोमध्ये बॉलिवूड स्टार कतरिनाच्या तोंडी एकही संवाद नाही. त्यामुळे कतरिनाच्या चाहत्यांमध्ये आणि ‘बी-टाऊन’मध्ये खळबळ उडू शकते. मात्र, कतरिनाला याची फिकीर नाही. कारण प्रदर्शनपूर्व प्रसिध्दीमध्ये कतरिनाच्या तोंडी संवाद नसले तरी, ‘धूम ३’च्या प्रदर्शित टायटल ट्रॅकमध्ये सध्या कतरिनाचीच ‘धूम’ आहे. कतरिनाच्या अदा असलेले ‘धूम ३’चे शिर्षकगीत सध्या इंटरनेट व सॅटेलाईटच्या माध्यमातून धूमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या महिनाभर आधीच कतरिनाच्या या शिर्षकगीताने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
‘धूम ३’च्या टायटल ट्रॅकमध्ये कतरिनाचीच ‘धूम’
चित्रपटगृहांमधून दाखवण्यात येणाऱ्या 'धूम ३'च्या प्रोमोमध्ये बॉलिवूड स्टार कतरिनाच्या तोंडी एकही संवाद नाही. त्यामुळे कतरिनाच्या चाहत्यांमध्ये
First published on: 28-11-2013 at 03:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif steals the show in title track of dhoom