गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर येत्या डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या लग्नाची तयार सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. कतरिना आणि विकी कौशल राजस्थानमध्ये भव्यदिव्य पद्धतीने लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. या दोघांचे लग्न राजस्थानमधील एका राजमहालात आयोजित करण्यात आले आहे. मात्र राजस्थानमधील महालात लग्न सोहळा करावा, यामागे नेमकी कोणाची कल्पना होती, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. नुकतंच यामागची माहिती समोर आली आहे.

‘बॉलिवूड लाईफ’ या वेबसाईटने दिलेल्या एका वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ आणि विकी कौशल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचेही बोललं जात आहे. या दोघांच्या लग्नाचा संपूर्ण सोहळा आठवडाभर रंगणार आहे. येत्या १ डिसेंबर ते ७ डिसेंबरमध्ये ते दोघेही लग्न करतील असे म्हटलं जात आहे. या दोघांचे लग्न राजस्थानमधील सवाई माधोपूर या ठिकाणच्या सिक्स सेन्सेस राजमहालात आयोजित करण्यात आला आहे. त्या दोघांचा विवाह अलिशान आणि भव्यदिव्य पद्धतीने होणार असल्याचेही बोललं जात आहे.

या लग्नासाठी कतरिनाचा लेहेंगा हा लोकप्रिय फॅशन डिझायनर सब्यासाची डिझाइन करत असल्याचे बोललं जात आहे. कतरिना आणि विकी दोघेही त्यांच्या लग्नाचे कपडे फायनल करत आहेत. तर दुसरीकडे या दोघांची पालक हे राजस्थानमध्ये लग्नाची तयारी करण्यात व्यस्त असल्याचे बोललं जात आहे. मात्र राजस्थानमधील राजमहालात लग्न करावे, हा प्रस्ताव नेमका कोणाचा होता? असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला होता.

याबद्दल कतरिनाच्या एका जवळच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, कतरिनाला राजा-महाराजा यांच्याप्रमाणे भव्यदिव्य लग्न करायचे होते. वधूचे कपडे, दागिने अशा पारंपारिक स्वरुपात तिचे लग्न व्हावे, अशी तिची फार इच्छा आहे. तिला राजस्थानची पारंपारिक संस्कृती फार आवडते. काही दिवसांपूर्वी ती राजस्थानमध्ये एका लग्नाच्या निमित्ताने गेली होती. त्यावेळी तो सर्व थाट पाहून ती थक्क झाली. त्यावेळी तिने जेव्हा माझे लग्न होईल, तेव्हा ते अशाचपद्धतीने भव्य स्वरुपात असेल, असे म्हटले होते. त्यामुळेच कतरिनानेच स्वत: राजमहालात लग्न करण्याची योजना आखली असावी, असे बोललं जात आहे. तिची ही कल्पना विकीलाही आवडल्याने त्यानेही अशाप्रकारे लग्न करण्यास होकार दर्शवला असल्याचे शक्यता आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नात ‘या’ अभिनेत्याने घातला खोडा?

दरम्यान सध्या कतरिना ही गेल्या काही दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट सूर्यवंशीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सूर्यवंशी चित्रपटात अक्षय कुमार हा मुख्य भूमिकेत असल्यामुळे सध्या तोही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे.