बॉलीवूड सुपरस्टार कतरिना कैफने आज (गुरुवारी) शेख सलीम चिश्तीच्या दर्ग्यास भेट दिली. तसेच, कतरिनाने दर्ग्यात गाण्याचे शूटिंग करण्याचीही इच्छा दर्शविली आहे.
३० वर्षीय कतरिनाने पहाटे ६ वाजता दर्ग्यास भेट दिली. प्रार्थना केल्यावर कतरिनाने इच्छापूर्तिसाठी तिथे पवित्र लाल धागा बांधल्याचे दर्ग्याचे धर्म प्रमुख पिरझादा रईस मियान चिश्ती यांचा मुलगा अर्शद फरीदी याने सांगितले. तसेच ते म्हणाले की, कतरिनाची शेख सलीम चिश्ती यांच्यावर श्रद्धा असून तिच्या चित्रपटांच्या यशाकरिता प्रार्थना करण्यासाठी अनेकदा ती येथे येते.
कतरिनाने दर्ग्यात गाण्याचे चित्रिकरण करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यावर आम्ही आनंदाने याची परवानगी देऊ, असे अर्शद म्हणाले. ‘गर्म हवा’ आणि ‘सनी देओलच्या ‘यतीम’ चित्रपटाचेही या दर्ग्यात चित्रिकरण करण्यात आले आहे.

Story img Loader