बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सलमानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला. आपल्या अभिनयाच्या स्टाइलने तसेच पिळदार शरीरयष्टीमुळे त्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. सलमानने त्याच्या ५६ व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन पनवेलमधील त्याच्या स्वत:च्या फार्महाऊसवर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सलमानच्या वाढदिवसानिमित्त अनेकजण त्याला शुभेच्छा देत आहे. नुकतंच सलमानला अभिनेत्री कतरिना कैफ हिने शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यासोबत तिने सलमानचा एक फोटोही शेअर केला आहे.

कतरिनाने शेअर केलेला हा फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे. त्यासोबत तिने हॅप्पी बर्थडे असे लिहिले एक कलरफुल जिफही पोस्ट केले आहे. त्यानंतर तिने खास पोस्ट शेअर करत सलमानला शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. असेच नेहमी प्रेमाचा वर्षाव करत राहा आणि असाच प्रकाश पसरवत राहा,” असे कतरिना म्हणाली. तिने यात सलमानलाही टॅग केले आहे.

त्यासोबतच अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही सलमानसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात शिल्पा शेट्टी म्हणाली, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझा कायमचा रॉकस्टार. धन्यवाद नेहमी “Being Youman”. अशाप्रकारे नेहमी वाघाची गर्जना करत राहा. नेहमी खूप खूप प्रेम.”

“…त्याने तीन वेळा मला दंश केला”, सर्पदंशानंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया

सलमान खानची को स्टार मैने प्यार किया मधील अभिनेत्री भाग्यश्रीनेही त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तिने बिग बॉस १५ चा एका फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने त्याला हटके कॅप्शनही दिले आहे. “मित्र तोच असतो ज्याला बघताच क्षणी वाटले पाहिजे की हा माझा मित्र आहे. मैत्री… जी कधीही बदलत नाही. आम्ही काही आठवणी तेव्हा तयार केल्या होत्या आणि नंतर त्या बिग बॉसच्या निमित्त त्याला पुन्हा उजाळा दिला. वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असे भाग्यश्री म्हणाली.

“सलमानला दंश करणाऱ्या सापाला पकडलं अन्…, वडील सलीम खान यांनी दिले संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण

सलमानच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये जिनिलिया देशमुख, रितेश देशमुख, बॉबी देओल, संगीता बिजलानी, सैफ अली खान, निखिल द्विवेदी, रजत शर्मा, वत्सल सेठ, अलवीरा खान, अतुल अग्निहोत्री उपस्थित होते. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर, सलमान या आधी सात तास रुग्णालयात होता.