‘धूम मचाले’ हे ‘धूम’ प्रकारातील चित्रपटाचे ‘टायटल साँग’ सर्वांना चांगलेच परिचयाचे आहे. लवकरच चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या ‘धूम ३’ चित्रपटातील कतरिना कैफचे ‘आयटम साँग’ असलेले ‘धूम मचाले’ या गाण्याने यू-ट्यूबवर शब्दश: ‘धूम मचा दिया है!’. यू-ट्यूबवर प्रदर्शित होताच केवळ चार दिवसांत या गाण्याला ३० लाख हिट्स मिळाले.
या पूर्वी या गाण्यावर ऐश्वर्या राय बच्चन, ईशा देओल आणि टाटा यंग यांनी आकर्षक नृत्य सादर केले होते. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून कतरिनानेसुद्धा आकर्षक नृत्य सादर केले.

आयटम साँगमधली आपली चुणूक ‘तीस मार खाँ’ या चित्रपटातील ‘शिला की जवानी’ गाण्याद्वारे कतरिनाने याआधीच दाखवली आहे. ‘धूम ३’ चित्रपटात कतरिना आलिया नावाच्या एका ‘एक्रोबॅट दिवा’ची भूमिका करीत आहे.
प्रितमचे संगीत असलेल्या ‘धूम मचाले’ गाण्याचे शब्द समीर अनजान यांचे असून, अदिती सिंग-शर्माने हे गाणे गायले आहे. आमिर खान, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ आणि उदय चोप्रा यांच्यादेखील भूमिका असलेला हा चित्रपट २० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होत आहे.

Story img Loader