Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre-Wedding : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा सुपूत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये अनंत-राधिकाचा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी दोघांचं दुसरं प्री-वेडिंग सुरू आलं. २९ मे पासून सुरू झालेलं अनंत-राधिकाचं हे प्री-वेडिंग इटली ते फ्रान्स प्रवास करत सुरू आहे. आज या प्री-वेडिंगचा शेवटचा दिवस आहे. अशातच अनंत-राधिकाच्या या बहुचर्चित प्री-वेडिंगमधले काही व्हिडीओ समोर आले आहेत.

अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये काल (३१ मे) तिसऱ्या दिवशी जगप्रसिद्ध अमेरिकन गायिका कॅटी पेरीने परफॉर्मन्स केला. फ्रान्स येथील कान्समध्ये कॅटी पेरीचा रॉकिंग परफॉर्मन्स झाला. याचा व्हिडीओ ‘बॉलीवूड नाउ’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
ankita walawalkar aka kokan hearted girl first kelvan
‘कोकण हार्टेड गर्ल’ची लगीनघाई! अंकिता-कुणालचं पार पडलं पहिलं केळवण, फोटो आला समोर, लग्नपत्रिका पाहिलीत का?

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये गुरू रंधावाच्या गाण्यावर रणवीर सिंहने ओरीला उचलून घेतलं अन्…, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओत, अमेरिकन गायिका कॅटी पेरीच्या गाण्यावर अंबानींचे पाहुणे जबरदस्त नाचताना पाहायला मिळत आहेत. या परफॉर्मन्ससाठी अंबानींनी कॅटी पेरीला कोट्यवधी मानधन दिलं आहे.

माहितीनुसार, अमेरिकन गायिकेचा कार्यक्रम फ्रान्समधील ५०.९ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास ४२४ कोटींच्या व्हिलामध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या थीमचं नाव ‘ला वीटा इ अन वियाजिओ’ असं होतं. ‘द सन यूके’च्या वृत्तानुसार, कॅटी पेरीला कान्समध्ये परफॉर्मन्ससाठी अंबानी कुटुंबाकडून लाखो डॉलरचा चेक मिळाला आहे. कॅटी खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्यासाठी १२ ते १६ कोटी मानधन घेते. त्यानुसार तिला अंबानींकडून मानधन मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – Video: विशाखा सुभेदारची भाची झळकली ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

दरम्यान, अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २९ मे ला लोकप्रिय अमेरिकन बँड, बॅकस्ट्रीट बॉइजने कूझवर परफॉर्मन्स केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये बँडमधील निक कार्टर, होवी डोरो, ब्रायन लिट्रेल, एजे मॅकलीन आणि केविन रिचर्डसन पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दिसत असून त्यांचं सुपरहिट गाणं ‘आय वांट इट दैट वे’वर परफॉर्म करताना पाहायला मिळत आहेत.

अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंगमध्ये रिहाना, दिलजीत दोसांझ, अरिजीत सिंह, श्रेया घोषाल आणि इतर गायकांनी परफॉर्मन्स केला होता. या गायकांच्या तालावर सेलिब्रिटी जबरदस्त थिरकले होते. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

Story img Loader