इंग्लंडचा राजा चार्ल्स तिसरा (King Charles III) याचा राज्याभिषेक सोहळा वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला. ब्रिटनमध्ये तब्बल ७० वर्षांनंतर असा शाही सोहळा पार पडला. हॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसह या सोहळ्याला अमेरिकन गायिका ‘केटी पेरी’नेसुद्धा हजेरी लावली होती. केटीसोबत गीतकार ‘लिओनेल रिची’ आणि अभिनेत्री ‘एम्मा थॉम्पसन’सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या सोहळ्यादरम्यानचा गायिका केटी पेरीचा व्हायरल झालेला एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा : ‘जवान’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे का ढकलली? शाहरुखने स्वत: सांगितले कारण, म्हणाला…
अमेरिकन गायिका केटी पेरी या सोहळ्याला ‘लॅव्हेंडर व्हिव्हिएन वेस्टवुड सूट’ परिधान करून आली होती. केटी कार्यक्रमस्थळी पोहोचताच तिला बसण्यासाठी जागा न मिळाल्याने ती गोंधळून गेली आणि तिची एकच तारांबळ उडाली. जागा शोधतानाचा तिचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “कार्यक्रमात जागा न मिळणे खूप त्रासदायक असते.” तर दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे की, सोहळ्याला आलेल्या पाहुण्यांसाठी चांगली व्यवस्था का नाही केली? अशा प्रकारे गैरसोय का? अशा प्रकारे नेटकरी या व्हायरल व्हिडीओवर व्यक्त झाले आहेत.
कार्यक्रमादरम्यान, केटी पेरी खूप वेळ जागा शोधण्याचा प्रयत्न करताना दिसली. बसण्यासाठी जागा मिळत नसल्याने ती इकडे-तिकडे खुर्चीचा शोध घेताना दिसली. एवढेच नाही तर रिकाम्या जागेकडे बोट दाखवून तिने प्रश्नसुद्धा केले. केटीने परिधान केलेली मोठी टोपी तिच्या डोळ्यावर येत असल्याने बराच वेळ तिचा गोंधळ उडाला होता.
हेही वाचा : ‘जवान’ची नवी रिलीज डेट ऐकून बॉलीवूड निर्माते सतर्क! आता ‘फुक्रे ३’ या दिवशी होणार प्रदर्शित
दरम्यान, केटी पेरी राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान जागा शोधत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, “काळजी करू नका! मित्रांनो, मला बसण्यासाठी जागा सापडली आहे,” असे स्वत: ट्वीट करत केटी पेरीने यावर आपली प्रतिक्रिया देत, चाहत्यांना माहिती दिली आहे.