माहितीचा स्त्रोत म्हणून छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ पाहिला जातो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. आता या शोचे १३ वे पर्व सुरु आहे. या शोचा शानदार शुक्रवार या स्पेशल एपिसोडमध्ये यावेळी अभिनेता सोनू सूद आणि कॉमेडियन कपिल शर्माने हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी बऱ्याच गप्पा मारल्या आणि अनेक किस्से सांगितले.
शो दरम्यान, कपिलने अमिताभ यांना इन्स्टाग्रामवरील काही जून्या पोस्ट दाखवल्या. ज्यावर नेटकऱ्यांनी काही मजेशीर कमेंट केल्या होत्या. यात एक पोस्ट होती जिथे अमिताभ हे हवेत लाथ मारत असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत वय झालं आहे, पण अजूनही पाय चालतात.
या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “सर पाय तर प्रत्येक पुरुषाचे चालतात. श्रीमतींसमोर तुमचं तोंड चालत का? कारण माझं तर नाही चालतं. ही कमेंट पाहिल्यानंतर अमिताभ हसतात आणि बोलतात की माझं बोलणं चालत नाही. हे ऐकून कपिल आणि सोनू हसू लागले.”
कपिलने शोमध्ये अमिताभ यांचे रिमझिम गिरे सावन हे गाणं गायलं. त्याने अमिताभ आणि शत्रुघ्न सिन्हा यांची अॅक्टिंग केली होती. एवढंच काय तर कंगनामुळे त्याचा जीम ट्रेनर त्याला सोडून गेल्याचं पण सांगितलं.