‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये देशभरातील अनेक स्पर्धक आपलं स्वप्न उराशी बाळगून येत असतात. यावेळी हॉट सीटवर बसणारे स्पर्धक बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारतात. तर अनेक स्पर्धक जीवनातील संघर्ष, कटू गोड आठवणी आणि खासगी गोष्टी शोमध्ये शेअर करत असतात. बिग बी अमिताभ बच्चनदेखील त्यांच्या आयुष्यातील आणि करियरमधील किस्से या स्पर्धकांसोबक शेअर करताना दिसतात. मात्र एका स्पर्धकाने बिग बींसोबत आपल्या पतीबद्दल शेअर केलेल्या काही गोष्टींमुळे आता एक नवा वाद निर्माण झाला आहे.

गेल्या महिन्यात ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये श्रद्धा खरे नावाच्या महिलेने हजेरी लावली होती. बिग बींसोबत या महिलेने तिच्या खासगी आयुष्यातीस संघर्षाबद्दल भावना व्यक्त केल्या. यावेळी श्रद्धा यांनी पतीने कधीच संघर्षाच्या काळात साथ न दिल्याचं बिग बींना सांगितलं. तसचं पतीच्या तक्रारी केल्या. यानंतर आता श्रद्धा खरे यांच्या पतीने श्रद्धा यांच्यासोबच चॅनलविरोधात कायदेशीर पाऊल उचलंल आहे. प्रतिमा खराब केल्याचा आरोप श्रद्धा यांच्या पतीने केलाय. तसचं त्यांनी पत्नीसह सोनी वाहिनीवर गुन्हा दाखल केलाय.

‘त्या’ सिनेमाच्या संपूर्ण बजेटहून जास्त खर्च ‘हिरोईन’साठी करीनाच्या कपड्यांवर झाला होता; मधुर भांडारकर यांचा खुलासा

श्रद्धा यांचे पती विनय खरे यांना ट्विटरवर एक पोस्ट शेअर केलीय. विनय यांनी या प्रकरणी चॅनलला नोटीस पाठवली असून त्याचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यात लिहिलंय, “माझी पत्नी केबीसीच्या हॉटसीटवर बसली होती आणि तिने अंडरट्रायल केस असूनही माझा अपमान केलाय. त्यामुळे कायदेशीर नोटीस पाठवली आहे.”

तसचं विनय यांनी पत्नीने केबीसी शोमध्ये त्यांच्यावर केलेल्या आरोपांचं सोशल मीडियावर उत्तर दिलंय. तसचं त्यांनी सोनी वाहिनीवर देखील काही आरोप केले आहेत. अंडरट्रायल केस सुरु असताना चॅनेल एकाच पक्षाची बाजू कसं मांडू शकतं? असा आरोप त्यांनी केलाय. या शोमध्ये श्रद्धा खरे यांनी फक्त १० हजार रुपये रक्कम जिंकली होती.

Story img Loader